जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Stress कमी करण्यासाठी रोज खा मासे; डायबेटीज रुग्णांसाठीही फायदेशीर

Stress कमी करण्यासाठी रोज खा मासे; डायबेटीज रुग्णांसाठीही फायदेशीर

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

मासे खाल्ल्यामुळे शरीरातल्या बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कमी होतं आणि हार्ड हेल्दी होतं याशिवाय शरीरातली विटामिन डीची (Vitamin D) कमतरता दूर होते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जून :  शाकाहारी किंवा मांसाहारी खाणाऱ्यांसाठी हेल्दी डाएटसाठी (Healthy Diet) अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण, नॉनव्हेज खाणाऱ्यांना व्हेजिटेरीयन लोकांपेक्षा जरा जास्त पर्याय उपलब्ध असतात. मनावरचा ताण (Mental Stress) वाढला असेल तर, तो कमी करण्यासाठी आहारातील काही घटकांचा उपयोग होतो. मासे (Fish) खाण्याने स्ट्रेस कमी होतो. मांसाहारी लोकांना आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश जरूर करावा. मासे खाण्याचे अनेक (Benefits of Fish) फायदे असतात. मासे चविष्ट असतात शिवाय आरोग्यासाठीही लाभदायक असतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल कमी (Low Cholesterol) होऊन हार्ट हेल्दी राहतं. यात भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमीन डी असतं. त्यामुळे हाडं मजबूत राहतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी मासे खायला हवेत. मासे शिजायलाही सोपे असतात आणि सहजपणे बनवता येतात. जाणून घेऊयात मासे खाण्याचे फायदे. ( ‘हे’ पदार्थ आहेत पोटासाठी घातक; पोटदुखीत अजिबात खाऊ नका ) गुड फॅट माशांमध्ये गुड फॅट असतं त्यामुळे मासे आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असतात. माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं.   फॅटी ऍसिड डोळे आणि मेंदूसांठी फायदेशीर आहे. हेल्दी हार्ट माशामध्ये सॅच्युरेटेड फॅट नसतं आणि त्यामुळेच हृदयासाठी अतिशय लाभदायक आहेत. चिकन-मटण हे प्रोटीनचा मोठा स्त्रोत असतात मात्र, त्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढतं. हृदय चांगलं ठेवायचं असेल तर मासे खावेत. माशांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं. ( पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी; या टीप्स फॉलो करा बिलकुल खराब होणार नाही ) व्हिटॅमीन डी मासे व्हिटॅमीन डीचा प्राकृतिक स्त्रोत आहेत. व्हिटॅमीन डी शरीरामध्ये पोषक घटक शोषण करण्यासाठी आणि हाडं मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. माशांमध्ये व्हिटॅमीन डी भरपूर असतं. स्ट्रेस कमी होतं माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, DHA आणि व्हिटॅमीन डी देखील भरपूर असतं. मासे खाल्ल्यामुळे शरीराला पोषक घटक वाढतात. त्यामुळे स्ट्रेस देखील कमी होतो. ( कशाला हवा आयड्रॉप; घरगुती उपायांनी काही मिनिटांत थकलेल्या डोळ्यांना करा फ्रेश ) डायबिटीमध्ये फायदा नियमीत मासे खाणाऱ्यांना डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. कारण माशांमधील पोषक घटक शरीरामधील साखरेवर नियंत्रण करतात शिवाय अनेक आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात