Home /News /lifestyle /

‘हे’ पदार्थ आहेत पोटासाठी घातक; पोटदुखीत अजिबात खाऊ नका

‘हे’ पदार्थ आहेत पोटासाठी घातक; पोटदुखीत अजिबात खाऊ नका

. पोटदुखीचा त्रास होत असेल तर,काही पदार्थ खाणं टाळायला हवं.

. पोटदुखीचा त्रास होत असेल तर,काही पदार्थ खाणं टाळायला हवं.

पोटदुखीमुळे (Abdominal Pain)परिस्थिती इतकी वाईट होते की डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.

    मुंबई, 28 जून : काही जणांची पचनशक्ती कमजोर (Poor Digestionअसते. त्यामुळे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना लगेच अपचन किंवा बद्धकोष्ठता (Indigestion or Constipationसारखा त्रास व्हायला लागतो. कधी कधी लूजमोशन्स (Loose motions) होऊ शकतात. कधीकधी पोटदुखीमुळे (Abdominal Painपरिस्थिती इतकी वाईट होते की डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही पदार्थ पोटासाठी अतिशय जड असतात. त्यामुळेच त्रास होतो आणि पोटदुखी होऊ शकते. पोटदुखीचा त्रास होत असेल तर,काही पदार्थ खाणं टाळायला हवं. प्रोसेस्ड फूड प्रोसेस्ड फूडमध्ये फायबरची मात्रा अजिबात नसते. त्यामुळे अपचनासारखे त्रास होतात. याशिवाय प्रोसेस्ड फूडमध्ये ट्रान्सफॅटची पातळी उच्च असते. त्यामुळे इफ्लामेशन वाढतं आणि पोट दुखी होऊ शकते. (काय सांगता! फक्त झोपूनही घटू शकतं वजन; पूर्ण होईल स्लीम ट्रिम होण्याचं स्वप्न) सायट्रिक ऍसिड असणारे पदार्थ सायट्रिक ऍसिड आपल्या आरोग्यासाठी चांगलं असलं तरीदेखील सायट्रिक ऍसिडमुळे पोटदुखी वाढू शकते. लिंबू, संत्र यासारख्या आंबट पदार्थांमध्ये सायट्रिक ऍसिड जास्त असतं. त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. (कशाला हवा आयड्रॉप; घरगुती उपायांनी काही मिनिटांत थकलेल्या डोळ्यांना करा फ्रेश) जास्त फायबर असलेले पदार्थ टाळा पचन व्यवस्था चांगली करायची असेल तर, फायबरयुक्त पदार्थ खायला हवेत असं सांगितलं जाते. मात्र, जास्त फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फायबरयुक्त पदार्थ खावेत. मसालेदार पदार्थ बऱ्याच जणांना मसालेदार पदार्थ खायला आवडतं. मात्र मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होते आणि पोटदुखीचा त्रास होतो. या पदार्थांमधील मिरची आणि मसाल्यांमुळे आपल्याला लूज मोशनचाही त्रास होऊ शकतो. (जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?) कॅफिन युक्त पदार्थ कॅफिन हे आम्लीय पदार्थ आहे. ज्यामुळे पचन व्यवस्थेवर प्रभाव पडतो. यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो याशिवाय मळमळणे, पोटदुखी आणि लूज मोशन होऊ शकते. मद्यपान किंवा कोल्ड्रिंग पोटदुखी असताना मद्यपान करू नये किंवा कोल्ड्रींक पिऊ नये. त्यामुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणात ऍसिड तयार होतं आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोटदुखी, उलटी आणि लूजमोश्न यासारखे त्रास मद्यपान किंवा कोल्ड्रिंक घेतल्यामुळे होऊ शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Stomach, Stomach pain

    पुढील बातम्या