मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कशाला हवा आयड्रॉप; घरगुती उपायांनी फक्त काही मिनिटांत थकलेल्या डोळ्यांना करा फ्रेश

कशाला हवा आयड्रॉप; घरगुती उपायांनी फक्त काही मिनिटांत थकलेल्या डोळ्यांना करा फ्रेश

या उपायांमुळे डोळेच (Eye) नाही तर डोळ्यांभोवतालची त्वचाही टवटवीत होईल.

या उपायांमुळे डोळेच (Eye) नाही तर डोळ्यांभोवतालची त्वचाही टवटवीत होईल.

या उपायांमुळे डोळेच (Eye) नाही तर डोळ्यांभोवतालची त्वचाही टवटवीत होईल.

मुंबई, 27 जून: कोरोनामुळे (Corona) आपली लाइफस्टाइल (Lifestyle) पूर्णपणे बदलली आहे. वर्क फ्रॉम होममुळे (Work from home) कामं तर ऑनलाइन केली जात आहेत. शिवाय शाळा, कॉलेजेसदेखील ऑनलाईनच अटेंड केली जात आहेत. त्यामुळे तासन् तास लॅपटॉपसमोर (Laptop) बसून राहावं लागतं आहे. जास्त वेळ लॅपटॉपच्या स्क्रीनवर (Laptop screen) पाहण्यामुळे डोळे थकतात. डोळ्यांचा थकवा (Eye Strain) सर्वसाधारण असला, तरी थकलेल्या डोळ्यांनी काम करणं किती अवघड आहे हेदेखील तुम्हाला माहिती असेलच. अशा परिस्थितीत डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय (Best Home Remedies To Reduce Eye Strain) तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय वापरून तुम्ही डोळ्यांचा थकवा दूर करू शकता. शिवाय तुमचे डोळे आणि डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा टवटवीत होईल. हे वाचा - कफ आणि वात दोघांनाही ठेवेल दूर; पावसाळ्यात घ्या असा उत्तम आहार चला तर जाणून घेऊ या, अगदी काही मिनिटांत आपण आपल्या डोळ्यांचा थकवा कसा घालवू शकतो ते. 1. थंड पाणी शिंपडा अनेक तास स्क्रीनसमोर बसून काम केल्याने डोळ्यांमध्ये वेदना आणि जळजळ होते. डोळ्यांतली वेदना आणि त्यामुळे होणारी चिडचिड कमी करण्यासाठी थंड पाण्याचा (cold water) वापर करावा. कामातून ब्रेक (break) घ्यावा आणि फ्रीजचं पाणी (fridge water) डोळ्यांवर शिंपडावं. असं केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल आणि ताणही कमी होईल. 2. तुळस आणि पुदिन्याचा वापर डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुळस आणि पुदिना वापरा. यासाठी तुळस आणि पुदिनाची पानं रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसर्‍या दिवशी कापूस या पाण्यात भिजवून डोळ्यावर ठेवावा. असं केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि त्वचादेखील (skin) तणावमुक्त होईल. 3. गुलाबजलाचा वापर डोळ्यांचा थकवा आणि त्यामुळे होणारी चिडचिड दूर करण्यासाठी तुम्ही गुलाबजल (rose water) वापरू शकता. एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळा. यानंतर त्यात कापूस किंवा सुती कापड भिजवावं आणि डोळ्यावर ठेवावं. पाच मिनिटांनंतर ते काढावं. असं दिवसातून तीन ते चार वेळा करू शकता. यामुळे डोळ्यांची जळजळ आणि थकवा कमी होईल. हे वाचा - काय सांगता! फक्त झोपूनही घटू शकतं वजन; पूर्ण होईल स्लीम ट्रिम होण्याचं स्वप्न कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून आपण घरातच आहोत. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. मात्र सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाइलसमोर बसून राहिल्याने डोळ्यांचे त्रासदेखील वाढत आहेत. डोळे फार संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. वर सांगितलेल्या काही टिप्स वापरून तुम्ही डोळ्यांचा थकवा घालवू शकता.
First published:

Tags: Eyes damage, Health, Health Tips, Lifestyle, Work from home

पुढील बातम्या