वाढत्या वयानुसार शरीर कमजोर व्हायला लागतं. तरूण वयात मुलांच्या संगोपनात आईवडील आपल्या बिघडत्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात. पण, पन्नाशी नंतर काही आजार डोकं वर वाढतात.
50 वर्षांनंतर त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज असते. वडीलांच्या शरीरात काही लक्षणं जाणवत असतील तर, त्याकडे लक्ष द्या.
50 वर्षांनंतर ब्रेन फंक्शन वाढतं. 55 वर्षांनंतर मेंदूचं काम हळूहळू व्हायला लागतं. स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. जर वडील काही गोष्टी विसरत असतील, त्यांच्यावर वाढत्या वायाचा परिणाम होत आहे असं समजा. त्यांच्या आहाराची काळजी घ्यायला सुरुवात करा. फळं,भाज्या, हल्दी फॅट, कडधान्य, ड्रायफ्रुट खायला द्या.
वाढत्या वयात रोग प्रतिकारशक्ती कमजोर व्हायला लागते. त्यामुळे फ्लू, निमोनिया आणि टिटनस सारखे आजार व्हायची भीती वाढते.वयाच्या पन्नाशी नंतर फ्लूची व्हॅक्सिन घ्यावी.
याच वयात ऐकायला कमी येण्याचा त्रास व्हायला लागतो. 40 टक्के लोकांमध्ये ऐकण्याची क्षमता कमी होते. हाय ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम किंवा डायबिटीज सारख्या आजारांमुळे कानांवर परिणाम होतो. अशावेळेस डॉक्टरांशी संपर्क साधावा
वयाच्या पन्नाशीनंतर हाडं कमजोर होतात. त्यामुळे हाडं तुटण्याची भीती जास्त असते. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमीन डी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. व्यायामाकडेही लक्ष द्यावं
याच वयात संधिवात होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात बाक येऊ शकतो. शिवाय, स्नायू कमजोर होतात. त्यामुळे नियमीत एक्ससाईज कराव्यात.
पन्नाशीनंतर हार्ट अटॅकची शक्यता वाढलेली असते. त्यामुळे नियमीत व्यायाम आणि वॉक करावा. वजनावर आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहिल याकडे लक्ष द्यावं. धुम्रपानासारख्या व्यसनांपासून दूर रहावं.
वयाप्रमाणे त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. पुरूषांमध्ये केस गळणं, पांढरे होणं, त्वचेवर सुरकुत्या येणं, डाग उठणं असे त्रास होतात. पण, स्किन कॅन्सर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
40 ते 45 वर्षातच माणसाला डोळ्यांचे त्रास होतात. चष्म्याचा नंबर वाढतो, मोतीबिंदू होतो. त्यामुळे डोळ्यांची नियमीत तपासणी कारावी.
वाढत्या वयानुसार शरीर कमजोर व्हायला लागतं. तरूण वयात मुलांच्या संगोपनात आईवडील आपल्या बिघडत्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात. पण, पन्नाशी नंतर काही आजार डोक कर वाढतात.