• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • सावधान! पावसाळ्यात मासिक पाळीच्या काळात होऊ शकतं इनफेक्शन; अशा प्रकारे घ्या काळजी

सावधान! पावसाळ्यात मासिक पाळीच्या काळात होऊ शकतं इनफेक्शन; अशा प्रकारे घ्या काळजी

सॅनिटरी पॅड लिकजे होण्याची भिती असतेच.

सॅनिटरी पॅड लिकजे होण्याची भिती असतेच.

पावसाळ्यात (Monsoon) पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेणं जास्त महत्वाचं ठरतं. कारण या काळात संसर्ग (Infection) होण्याची शक्यता जास्त असते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जुलै : पावसाळ्यात (Monsoon) बदलेलं तापमान पाहता आपली रोग प्रतिकारशक्ती (Immunity) कमी झालेली असते. याकाळात महिलांनी स्वच्छतेची (Cleaning) काळजी जास्त घ्यायला हवी. कारण या काळाच इनफेक्शन (Infection) होण्याची जास्त भीती असते. पाळीच्या काळात जास्त स्वच्छता बाळगावी लागते. अस्वच्छतेमुळे युरिन ट्रॅक इनफेक्शन (Urine track Infection) किंवा योनी मार्गात इनफेक्शन होऊ शकतं. पीरियडमध्ये महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक हे जाणून घेऊयात. नॅपकिन बदलत रहाबऱ्याच महिला पाळीच्या काळात सतत पॅड बदलत नाहीत.पण, पावसाळ्यात बॅक्टेरियल इन्फेक्शनची भीती जास्त असते. त्यामुळे दर 3 ते 4 तासांनी पॅड बदलायला हवा. (‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय) ओलाव्याची काळजी घ्या पाळीच्या काळात आपला प्रायवेट पार्ट खुप ओला असतो. पावसामुळे हवामानातही दमटपणा वाढलेला असतो. शौचालयात गेल्यानंतर किंवा पाण्याचा वापर करूनही प्रायवेट पार्टचा भाग कोरडा करत नाहीत. त्यामुळे त्याभागात ओलावा आणखी वाढतो. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच,टॉयलेटमध्ये गेल्यावर किंवा पाण्याचा वापर केल्यानंतर खासगी भाग टिशू पेपरच्या सहाय्याने पूर्णपणे सुकवून त्यानंतर पॅड वापरा. (केसांसाठी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर; पांढरे केसही होतील काळेभोर) साबण वापरू नका महिला पाळीच्या काळात खाजगी भागा साफ करण्यासाठी फक्त साधा साबण वापरतात. पण, त्यामुळे नैसर्गिक PH लेव्हलची पातळी खराब होऊ शकते. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट उपलब्ध आहेत ज्यामुळे स्वच्छता तर होतेच शिवाय PHची पातळी व्यवस्थित राहते. (Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे) कोमट पाण्याने स्वच्छ करा मासिक पाळीच्या काळात झोपण्यापूर्वी दररोज रात्री कोमट पाण्याने आपला खाजगी भाग स्वच्छ करा. यानंतर टिशूने तो भाग पूर्णपणे कोरडा केल्यावरच पॅड वापरा. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. (सोन्याची अंगठी घातल्याने होतो फायदा; जाणून घ्या कोणत्या राशी ठरतात Lucky) सार्वजनिक शौचालय वापरू नका पीरियड्स दरम्यान सार्वजनिक शौचालयांचा वापर न करणं चांगलं. वापरायचं असल्यास सॅनिटायझर किंवा टॉयलेट स्प्रे वापरा. शौचालय वापरण्यापूर्वी आधी फ्लश करा.
  Published by:News18 Desk
  First published: