Home /News /lifestyle /

10 वर्षांनी आयुष्य वाढवायचं असेल तर, रोज प्या कॉफी! कॅन्सरचा धोका होईल कमी

10 वर्षांनी आयुष्य वाढवायचं असेल तर, रोज प्या कॉफी! कॅन्सरचा धोका होईल कमी

खरं वाटत नाहीये, पण हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे की, टाईप 2 डायबिटीस, डिप्रेशन, सुसाईड, लिव्हर कॅन्सर, मेलेनोमा आणि प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या अनेक आजारांची भीती कॉफी पिण्यामुळे कमी होते.

    दिल्ली, 26 जून : फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) प्रेस कॉन्फरन्स वेळी टेबलवर ठेवलेल्या कोकालोच्या बाटल्या (Coca cola bottle) बाजूला करत पाण्याची बाटली उंचावत पाणी प्यायला महत्व द्यायला सांगितलं. त्यानंतर या गोष्टीवर जगभरामध्ये चर्चा सुरू झाली. त्याच्या या कृतीमुळे कोका कोला कंपनीचं करोडचं नुकसान झालेलं असलं तर देखील सॉफ्ट ड्रिंक (Soft Drink) खरोखरच आरोग्यासाठी नुकसानदायक आहेत. यावर आता पुन्हा चर्चा व्हायला लागलेली आहे. दरवर्षी जगभरामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू सॉफ्ट ड्रिंक पिण्याच्या सवयीमुळे होतो असं समोर आलं आहे. आरोग्यविषयक घडामोडींवर लेखन करणारे लेखक वेड मेरेडिथ यांच्यामते कोल्ड ड्रिंक (Cold Drink) शरीरात गेल्यानंतर 1 तासानंतर आपल्या शरीरावरही परिणाम करायला सुरुवात करतात. या संदर्भामध्ये हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने (Harvard School of Public Health) संशोधन केलं आहे. त्यांच्यामध्ये कोल्ड ड्रिंकमुळे वजन तर,वाढतंच याशिवाय जगभरामध्ये अनेक लोकांच्या मृत्यूचं कारण देखील कोल्ड ड्रिंक पिण्याचीच सवय आहे. जगभरात दीड लाख लोकांना डायबेटिस, 6000 लोकांना कॅन्सर आणि 44,000 लोकांना कोल्ड ड्रिंक पिण्याच्या सवयीने हृदयासंबंधी त्रासाने आजार झाले आहेत. (रोज खा ‘हे’ पदार्थ;आयुष्यातला हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत) त्यामुळे कोल्ड ड्रिंक पिण्याची इच्छा झाली तर, त्याला कोणता पर्याय आहे यावरही विचाकर केला जात आहे. सॉफ्ट ड्रिंक ऐवजी लिंबूपाणी, ताज्या फळांचा रस, नारळ पाणी आणि कॉफी सुद्धा पिता येऊ शकते असं सांगितलं जातंय. (Yuck! जिमध्ये 1 हजार किलोचं वजन उचललं आणि चड्डीतच XXX ; बॉडीबिल्डरचा VIDEO VIRAL) द न्यु इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये कॉफी कॅफीन ऍन्ड हेल्थ नावाने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार कॉफीने  टाईप 2 डायबिटीस, डिप्रेशन, सुसाईड, लिव्हर कॅन्सर, मेलेनोमा आणि प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या अनेक आजारांची भीती कॉफी (Coffee)  पिण्यामुळे कमी होते.अनेक आजार दूर होतात. टाईप 2 डायबिटीस, डिप्रेशन, सुसाईड, लिव्हर कॅन्सर, मेलेनोमा आणि प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या अनेक आजारांची भीती कॉफी पिण्यामुळे कमी होते. (काळ्या मिरीचा हा उपयोग माहिती झाला की, हेअर डाय वापरणं सोडून द्याल) कॉफीवर जगभरामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यांच्या मते दिवसांमध्ये 5 ते 6 कप कॉफी पिण्याने डेथ रेट कमी होतो. तर, दिवसात 3 ते 5 कप कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये लवकर मृत्यू होण्याची भीती 15 टक्‍क्‍यांनी कमी झालेली आहे. तर 50 टक्के पुरुष आणि महिलांमध्ये कॉफी पिण्यामुळे सुसाईड करण्याचे विचार येणं कमी झालं आहे. कॉफी मेंदूमध्ये एंटीडिप्रेसेंट इफेक्ट असणारं केमिकल प्रोडक्शन वाढवण्यास मदत करते. 5 लाख लोकांवर ब्रिटनमध्ये संशोधन करण्यात आलं त्यानुसार कॉफी पिण्यामुळे 10 वर्षाने आयुष्य वाढतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cancer, Coffee, Health Tips, Research

    पुढील बातम्या