Home /News /lifestyle /

Yuck! जिममध्ये एक हजार किलोचं वजन उचललं आणि चड्डीतच XXX ; बॉडीबिल्डरचा VIDEO VIRAL

Yuck! जिममध्ये एक हजार किलोचं वजन उचललं आणि चड्डीतच XXX ; बॉडीबिल्डरचा VIDEO VIRAL

भारी वजन उचलण्याच्या नादात बॉडीबिल्डरसोबत Opps मुव्हमेंट घडली.

    ब्रिटन, 18 जून : बॉडीबिल्डर्सचे (Bodybuider) तसे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यांची बॉडी पाहून आपल्याला आकर्षण वाटतंच. पण त्यासाठी ते लोक किती मेहनत करतात हे पाहून आश्चर्यही वाटतं. बरेच बॉडीबिल्डर जिममध्ये भारी वजन उचलून घाम गाळताना दिसतात. आपल्या सहकाऱ्यापेक्षा जास्त उचलण्याची स्पर्धाही त्यांच्यात रंगते आणि त्यामुळे आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत आपलं, शरीरचं वजन वाढवण्यासाठी ते आपल्या जीममधील वजन उचलण्याची क्षमताही वाढवतात. ताकदवर समजल्या जाणाऱ्या बॉडीबिल्डरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. यूकेचा बॉडी बिल्डर एडी हॉल (Eddie hall) ज्याला स्ट्राँगमॅन (Strongman) म्हणूनही ओळखलं जातं, त्याची बॉडी पाहून प्रत्येकाला कौतुक वाटतं. जास्तीत जास्त उचलण्यासाठी एडीला ओळखलं जातं. त्याला बीस्टही (Beast) म्हणतात. पण भारी वजन उचलण्याच्या नादात त्याच्यासोबत opps मुव्हमेंट घडली. त्याने चक्क पँटमध्येच शी केली. सामान्यपणे एडी जेव्हा लेग्ज एक्सरसाइज करतो तेव्हा स्क्वॅट्सच्या बहुतेक सेटने वॉर्मअप करतो. त्यानंतर प्रत्येक सेटसोबत तो वजन वाढवत जातो. काही दिवसांपूर्वीच हेली लिफ्ट कऱण्याच्या नादात त्याच्या पाय आणि हिप्समध्ये दुखापत झाली होती. त्यातून रिकव्हर झाल्यानंतर त्याने पुन्हा वर्कआऊट सुरू केलं आहे. याचदरम्यान त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. हे वाचा - लाजणं दूर तोंडातून ऐटीत सोडला धूर; नवरीचं असं रूप पाहून नवऱ्यासह अख्खं सासर गार व्हिडीओत पाहू शकता एडी एक हजार किलोच्या वजनाने लेग प्रेस करतो आहे. हे त्याचं आतापर्यंतचं सर्वात हेवी लिफ्ट होतं. पण हे वजन उचलताना एडीसोबत एक विचित्र घटना घडली. त्याने आपल्या पँटमध्ये पॉटी केली.  व्हिडीओत तो त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीशी बोलताना दिसतो आहे की. मी पॉटी केली आहे. तुला वास येत आहे का? आता मला टॉयलेटला जावं लागेल. यानंतर त्याने माफीही मागितली आहे.  व्हिडीओत एडी आपल्या चाहत्यांना, प्रेक्षकांना इतकं हेवी लिफ्ट करू नये, असा सल्लाही दिला आहे. हे वाचा - OMG! लग्नाच्या दिवशी नवरीचे भलतेच चाळे, नवरा शॉक; नववधूच्या प्रतापाचा VIDEO पाहा हा व्हिडीओ एडीने दोन वर्षांपूर्वी यूट्युबवर शेअर केला होता. जो आता पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. एडीने सांगितलं, एक्सरसाइझनंतर त्याला चक्कर येऊ लागली. त्याला पाठदुखीही सुरू झाली. त्यानंतरच त्याने ब्रेक घेतला होता. आता तो पुन्हा बॉक्सिंगमध्ये येतो आहे. आता हळूहळू वेट वाढवून लेफ्टिंग सुरू केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या