मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रोज खा ‘हे’ पदार्थ; आयुष्यातला हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत

रोज खा ‘हे’ पदार्थ; आयुष्यातला हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत

चीनमध्ये ही प्रथा परंपेरनुसार पाळली जाते.

चीनमध्ये ही प्रथा परंपेरनुसार पाळली जाते.

आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून आपण सेक्स लाईफचा (Sex Life) आनंद वाढवू शकता.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 19 जून : शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार (Healthy Food) घेणं आवश्यक आहे,तसंच चांगल्या वैवाहित जीवनासाठी चांगलं सेक्स लाईफही (Sex Life) खूप महत्वाचं आहे. निरोगी आहार शरीर निरोगी ठेवतं आणि एनर्जी देतं आणि सेक्स ड्राइव्ह (Sex Drive)सुधारतं.ज्या पुरुषांना इरेक्‍टाईल डिसफंक्‍शनचा (Erectile Dysfunction) त्रास आहे. त्यांनी आहारात काही सुधारणा कराव्यात. त्यामुळे त्यांचं लैंगिक जीवन खूप चांगलं बनू शकतं.आपल्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून चांगल्या लैंगिक जीवनाचा आनंद घेता येऊ शकते. कही हेल्दी पदार्थ शरीराचा थकवा दूर करतात, एनर्जी देतात, सेक्स हार्मोन्सला वाढवतात त्यामुळे सेक्स ड्राईव्ह सुधारतं. जाणून घेऊयात असे पदार्थ कोणते आहेत.

ड्रायफ्रुट

चांगल्या सेक्स लाईफसाठी आहारात ड्रायफ्रुट, शेंगदाणे या सारख्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे शरीर निरोगी राहतं. रोज ड्रायफ्रुट आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि लैंगिक ताकदही वाढते. यात भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे एनर्जी मिळते आणि अनेक आजार दूर राहता.

(महिलांमध्ये Infertility वाढतीये;काही सवयी ठरतात बाळाच्या जन्मातला मोठा अडथळा)

मांस आणि मासे

चांगल्या सेक्स लाईफसाठी मांस आणि मासे खाणं आवश्यक आहे.  मांस आणि मासे सेक्स ड्राईव्ह वाढवण्यात मदत करतात. त्यांने शरीरातील सेक्स हार्मोन्स योग्यप्रकारे कार्य करतात. मासे आणि चिकन प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. शरीरात प्रोटीनचं प्रमाण योग्य असेल तर, शरीरात एनर्जी राहते.

(Same to same! जुळ्या बहिणींचा नवराही एक; आता म्हणे, एकत्रच व्हायचंय pregnant)

बीट

बीट खाल्ल्याने शरीरात एनर्जी वाढते. बीटमधून नायट्रिक ऑक्साईड मिळतं त्यामुळे रक्तवाहिन्या किंचित फुगतात. यामुळे रक्ताचा प्रवाह खालच्या दिशेने वाढतो आणि व्यक्ती उत्साही वाटतं. बीटमध्ये बोरॉनचे प्रमाण देखील खुप जास्त आहे. सेक्स हार्मोन्स तयार करण्यात बोरॉनची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या व्यतिरिक्त,जेव्हा पुरुषांमध्ये इरेक्‍टाईल डिस्फंक्‍शनचा त्रास वाढतो. तेव्हा बीट खूप उपयोगी ठरतं आणि यामुळे सेक्स ड्राईव्ह वाढतो.

सफरचंद

दिवसातून एकतरी सफरचंद खाल्लं तर आरोग्य चांगलं राहतंच शिवाय लैंगिक शक्तीही वाढते. आपलं सेक्स लाईफ चांगलं करण्यासाठी सफरचंद खावं. सफरचंद खाल्ल्याने काही मिनिटांतच शरीराचा थकवा दूर होतो.

First published:

Tags: Sexual health, Sexual relationship