• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • काळ्या मिरीचा हा उपयोग माहिती झाला की, हेअर डाय वापरणं सोडून द्याल

काळ्या मिरीचा हा उपयोग माहिती झाला की, हेअर डाय वापरणं सोडून द्याल

खाण्यापेक्षा केसांना लावा काळी कोंडा जाईल निघून.

खाण्यापेक्षा केसांना लावा काळी कोंडा जाईल निघून.

कोंड्यामुळे केस वेगाने गळत (Hair Fall) असतील, पांढरे होत असतील तर, काळ्या मिरीचा (Black Paper) वापर करा. कसा ते वाचा..

 • Share this:
  दिल्ली,18 जून : आपल्या स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे असे कितीतरी पदार्थ असतात ज्यांचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties)आपल्याला माहिती नसतात. आपण केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी त्यांचा वापर करत असतो. त्याचे औषधी गुणधर्म माहिती नसल्याने योग्य प्रकारे वापरच होत नाही. काळी मिरी हा देखील असाच एक पदार्थ आहे. काळी मिरी (Black Pepper)केवळ आरोग्यासाठीच चांगली नसते. तर, केस आणि त्वचा देखील निरोगी(Hair & Skin Health)ठेवण्याचं काम करू शकते. काळ्या मिरीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते (Immunity Booster). काळी मिरी खोकला,सर्दी आणि पचनाच्या त्रासात उपयुक्त ठरते. एवढेच नाही तर हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. पण,काळी मिरी केसांसाठीही चांगली असते हे तुम्हाला माहिती आहे का? डोक्यात कोंडा(Dandruff)झाला असेल आणि त्यामुळे केस खूप गळत(Hair Fall)असतील तर, काळी मिरीच्या वापराने फायदा मिळेल. याशिवाय काळी मिरी पांढरे केस काळे करण्यातही मदत करते, केसांची वाढ होते. केसांमध्ये काळी मिरी लावल्याने कसा फायदा होतो जाणून घेऊयात. (साधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा) पांढर्‍या केसांसाठी दही आणि मिरपूड हेअर पॅक केस पांढरे व्हायला लागले असती तर, केसात काळी मिरी आणि दह्याचा हेअर पॅक लावा. केस वेळेआधी पांढरे व्हायला लागले असतील तर,काळी मिरी उपयोगी आहे. यात भरपूर कॉपर असतं. दही आपल्या केसांना मॉइश्चराईझ करतं आणि व्हिटॅमिन सीची कमी दूर करतं. हा हेअर पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 1 कप दही घ्या. त्यात 2 चमचे काळी मिरी पावडर घाला आणि मिक्स करा. 1 चमचा मध घालून मिक्स करा. हा हेअर पॅक स्कॅल्प आणि केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर केस केस धुवून टाका. (शरीर ठेवतील कूल आणि हार्ट हेल्दी; हृदयासाठी उत्तम असे 5 DRINKS) कोंड्यासाठी मिरपूड आणि ऑलिव्ह ऑईल हेअर पॅक हवा बदलली की केसांमध्ये कोंडा होण्याचा त्रास सुरू होतो. स्कॅल्पला आणि केसांना काळी मिरी आणि ऑलिव्ह ऑइलने मॉलिश केल्याने फायदा होतो. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास केसातला कोंडा कमी होतो. एका भांड्यात 1 चमचा मिरपूड पावडर घ्या. त्यात व्हर्जिन ऑलिव्ह तेल घाला आणि चांगलं मिक्स करा. त्यात 2 चमचे लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण टाळूवर लावा, 1 तासाने किंवा दुसऱ्या दिवशी केस धुवा. याने आपल्याला डोक्यातील कोंडा जाण्यात मदत होईल.
  Published by:News18 Desk
  First published: