मुंबई, 26 जानेवारी : मानवी शरीरात कोट्यवधी जीवाणू आढळतात. यातील बहुतांश जीवाणू मानवी पोटात म्हणजेच आतड्यात असतात. असे मानले जाते की, मानवी शरीरात 50,000 अब्जाहून अधिक जीवाणू आढळतात. आतड्यात आढळल्यामुळे सामान्यतः लोकांना असे वाटू शकते की, या जीवाणूंचे काम पचनसंस्थेला मजबूत करणे आहे.
मात्र पचनसंस्था मजबूत करण्याबरोबरच या जीवाणूंचा संबंध आपल्या मेंदू आणि हृदयाशी देखील खूप खोल आहे. एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. इतकेच नाही तर अभ्यासानुसार, आतड्यात आढळणारे बॅक्टेरिया नैराश्य, चिंता आणि मेंदूच्या त्या ठिकाणाशीही संबंधित आहेत जिथून भावनांवर नियंत्रण ठेवले जाते.
किचनमधील हे पदार्थ आहेत खूप फायद्याचे, वजन कमी करून वाढवतील चेहऱ्यावरचा ग्लो
संशोधनात ही बाब समोर आली आहे
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, फ्लोरिडा विद्यापीठातील कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर ब्रूस आर स्टीव्हन्स यांनी सांगितले की, लोकांचे सहअस्तित्व बॅक्टेरियाशी संबंधित आहे. कालांतराने जीवाणू मानवी शरीरात निवासस्थान बनले आहेत. सध्या आपल्या शरीरात राहणारे जीवाणू आपल्या चयापचय, आपल्या न्यूरॉन्स आणि अगदी आपल्या संपूर्ण शारीरिक प्रक्रियांमध्ये भाग घेतात. त्यांनी सांगितले की, मानव आणि मानवी जीवाणू हे मेटा ऑर्गनिझमसारखे आहेत. त्यामुळे शरीराच्या अनेक भागांवरही त्याचा परिणाम होतो.
भावना आणि संवेदनांशी देखील संबंधित
उदाहरणार्थ एका अभ्यासात, नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या आतड्यातून काही जीवाणू काढून उंदरांमध्ये टाकले गेले. त्यानंतर उंदरांमध्येही नैराश्याची लक्षणे दिसू लागली. उंदरांची वर्तणूक देखील उदासीनतेने ग्रस्त असलेल्या लोकांसारखीच झाली. म्हणजेच आतड्यात असलेल्या बॅक्टेरियामुळे नैराश्य आणि चिंता प्रभावित होऊ शकते.
त्याचप्रमाणे दुसर्या अभ्यासात जेव्हा काही लोकांना प्रोबायोटिक किंवा ताक दिले गेले तेव्हा त्यांच्या मेंदूच्या त्या भागावर परिणाम झाला, ज्यामुळे भावना आणि संवेदनांना उत्तेजन मिळते. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. क्रिस्टन टिलिश यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. चार वर्षांनंतर या विशेष बॅक्टेरियाचे प्रोफाइलही तयार करण्यात आले, ज्यामुळे मेंदूमध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती.
Coffee Before Workout : वर्कआउट करण्यापूर्वी कॉफी पिण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या कारण
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle