दररोज बाळांना आंघोळ घाला: बर्याच लोकांना असं वाटतं की पावसाळ्यात मुलांनी दररोज आंघोळ करू नये, त्यानं सर्दी होते. पण हे चूक आहे. बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी दररोज कोमट पाण्याने आंघोळ घालण्याची गरज आहे. आंघोळीपूर्वी मुलांना मसाज करणं देखील आवश्यक आहे. लक्षात ठेवा की मुलांना आंघोळ घालण्यासाठी तापमानानुसार थंड, कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करा.