Home /News /lifestyle /

युरिन इन्फेक्शनसाठी ऋजुता दिवेकर यांनी दिला नीरा पिण्याचा सल्ला; पाहा पूर्ण Video

युरिन इन्फेक्शनसाठी ऋजुता दिवेकर यांनी दिला नीरा पिण्याचा सल्ला; पाहा पूर्ण Video

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Celebrity Nutritionist Rujuta Divekar) यांनी UTI इन्फेक्शनबद्दल एक सिरीज आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर सुरू केली आहे.

  नवी दिल्ली, 13 ऑगस्ट :  लघवीला गेल्यावर जळजळ होणं किंवा त्रास होण्यासारखा त्रास होत असेल तर,  युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (Urinary Track Infection) असू शकतं. साधारणपणे 18-60 या वयोगटातील महिला आणि पुरूषांना UTI चा त्रास होतो. पण ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते. कारण महिलांना बॅक्टेरिया इन्फेक्शनाचा (Bacterial Infection) धोका जास्त असतो. लघवी करताना जळजळ होणं आणि दुखणं यासारखा त्रास जाणवतो. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. सेलिब्रेटी न्यूट्रिशियन(Celebrity Nutritionist) आणि डायटेशियन ऋजुता दिवेकर (Dietitian Rujuta Divekar) यांनी UTI इन्फेक्शनसदंर्भात एक व्हीडिओ सिरीज केली आहे. त्यामध्ये हे इन्फेक्शन का होतं, त्याची लक्षण आणि त्रास या बद्दल माहिती दिली आहे. (करीना कपूरने प्रेग्नेन्सीत खाल्ले डिंकाचे लाडू; पुरुषांसाठीही डिंक असतो लाभदायक) शिवाय हे इन्फेक्शन बरं करण्यासाठी काय करावं याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबूकवर आपल्या पेजवर हा व्हिडिओ (Video) शेअर केलेला आहे.
  ऋजुता दिवेकर आपल्या फॉलअर्ससाठी नेहमी नवीन माहिती देत असतात. याआधी त्यांनी योगा, कोरोना काळात आहार, मुलांचा आहार यासंर्भात बरीच माहिती दिली आहे. (काही चुका टाळल्या तरच येईल Facial Glow; ब्युटी पार्लरमध्ये जाण्याआधी वाचाच) त्यांना सोशल मीडियावर (Social Media) खूप फॅन फॉलोईंग आहे. करीना कपूर सारखे सेलिब्रेटी त्यांच्या सल्ल्याने आपला डाएट प्लॅन करतात.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram, Instagram post, Lifestyle, Video

  पुढील बातम्या