जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नागपूरात मित्रानेच मित्राचा केला गेम; दगडानं ठेचून निर्घृण हत्या

नागपूरात मित्रानेच मित्राचा केला गेम; दगडानं ठेचून निर्घृण हत्या

नागपूरात मित्रानेच मित्राचा केला गेम; दगडानं ठेचून निर्घृण हत्या

Murder in Nagpur: नागपूर जिल्ह्यातील उमरखेड याठिकाणी एका तरुणानं आपल्या जीवलग मित्राची (Friend) दगडानं ठेचून हत्या (Brutal Murder) केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उमरखेड, 31 जुलै: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील उमरखेड  (Umarkhed) याठिकाणी एका तरुणानं आपल्या जीवलग मित्राची (Friend) दगडानं ठेचून हत्या (Brutal Murder) केल्याची घटना समोर आली आहे.  आरोपीनं मित्राची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पैनगंगा नदीच्या पुलाजवळ टाकून पळ काढला होता. पण स्थानिक शेतकऱ्याला हा मृतदेह दिसल्यानंतर, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 5 ते 6 तासांत आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणातून मित्राची हत्या करण्यात आली हे अद्याप समोर आलं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अक्षय वसंतराव करे असं हत्या झालेल्या 20 वर्षीय युवकाचं नाव आहे. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी मुख्य आरोपी आकाश लोंढे याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतातील कार्तिक ट्रेंडिग कंपनीच्या शेड समोर घडली आहे. मृतदेह आढळताच ज्ञानेश्वर कदम यांनी याची माहिती उमरखेड पोलिसांना दिली. हेही वाचा- गेममुळे नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता, पोलिसांना 2,3 मोठे दगड, दारुचे बाटली आणि कागदी ग्लास सापडले आहेत. आरोपीनं मृत अक्षयसोबत रात्री दारू पिल्यानंतर त्याची दगडानं ठेचून हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. मृत अक्षय याच्या अंगावर आणि डोक्यावर दगडानं वार केलेल्या जखमा आढळल्या आहेत. हेही वाचा- एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीची आत्महत्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत मृत अक्षयच्या चार मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. आरोपी मित्र आकाश लोंढे यानंच अक्षयची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येचा नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात