Home /News /lifestyle /

OMG! रोजच्या जेवणातली ‘ही’ भाजी भारतातली नाहीच; जाणून घ्या इतिहास

OMG! रोजच्या जेवणातली ‘ही’ भाजी भारतातली नाहीच; जाणून घ्या इतिहास

शिमला मिरची मुळात हिरव्या रंगात विकली जाते.

शिमला मिरची मुळात हिरव्या रंगात विकली जाते.

या भाजीचा शिमल्याशी काय संबंध? सिमला मिरचीचा भारताशीही तसा काही संबंध नाही.. वाचा गंमत

    दिल्ली, 16 जून : देशाच्या सगळ्याच भागात शिमला मिरची परिचीत आहे. त्याला  काही लोक ढोबळी मिरची म्हणतात. याचा सिमल्याशी काय संबंध? खरं तर भारताशीही त्याचा तसा काही संबंध नाही. ऐकून गंमत वाटेल, ही भाजी भारतीय नाही. इंग्रजीत त्याला Capsicum किंवा green pepper म्हटलं जात. चायनीज पासून, पिझ्झा, बर्गर या पदार्थात तर शिमला असतेच पण, त्याबरोबर भाजी देखील आवडीने खाल्ली जाते. शिमला मिरची (Capsicum) किंवा आपली भोपळी मिरची, ढोबळी मिरची, पेपर्स लाल, पिवळा, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळते. या मिरच्या दिसायला तर सुंदर असतातच पण आरोग्यासाठी देखील गुणकारी (Health Benefits) मानल्या जातात. सिमला मिरची दक्षिण-मध्य अमेरिकेची(South-Central America) असल्याचं मानलं जातं. तिथे 3,000 वर्षांपासून शिमला मिरचीची शेती केली जाते. भारत येताना ब्रिटीश (British) शिमला मिरचीचं बी घेऊन आले होते आणि शिमलामधलं वातावरण पाहून त्या भागात शिमला मिरचीची लागवड करण्यात आली. त्यानंतर इथल्या वातावरणात पेपर्सच पिक चांगलं येऊ लागलं. पण, शिमलामध्ये(Shimla) शेती होत असल्याने तिला शिमला मिरची (Shimla MIrchi) हे नाव पडलं. आतातर सगळीकडेच ही भाजी मिळते. (कसं शक्य आहे? मधमाश्या तयार करू लागल्या निळ्या रंगाचं मध) शिमला मिर्चीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के, फायबर कॅरोटीनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. शिमला मिरचीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी देखील फायदेशीर आहे. शिमला मिरची ऍन्टिऑक्सिडंट एक चांगला सोर्स आहे. शिमला मिरची मुळात हिरव्या रंगात विकली जाते. पण, पिवळी आणि हिरव्या रंगाची शिमला आरोग्याला जास्त फायदेशीर असते. यातील ऍन्टिऑक्सिडंट शरीरात रक्त प्रवाह सुधारतं तर, संधिवात असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर, शिमला मिरची खावी. (OMG! या देशांमध्ये पुरुषांनाही दिसतात प्रेग्नन्सीची लक्षणं, खरं की काय?) शिमला मिरची मधील व्हिटॅमीन आणि ऍन्टिऑक्सिडंट(Vitamin & antioxidant) शरीरामधील साखरेच्या पातळीवरती नियंत्रण (Blood Sugar Control) करण्यात मदत करतात. शिमला मिरची खाण्याने कॅन्सर सारख्या रोगापासून देखील शरीराचा बचाव होतो. शिमला मिरचीमध्ये आयर्न आणि व्हिटॅमीन्स असतात. त्यामुळे रक्तामधील आयर्नची कमतरता दूर होते आणि आणि ॲनिमियाचा त्रास कमी होतो. वजन कमी करण्यासाठी शिमला मिरची अत्यंत फायदेशीर आहे. (कोरोनामुक्त झाल्यानंतर मंदावलेली भूक, अ‍ॅसिडीटीकडे बिलकुल दुर्लक्ष नको कारण...) शिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि जॅक्सेथीन नावाचे तत्व असतात. त्यामुळे शिमला मिरची खाण्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. हिरव्या शिमला मिर्चीमध्ये कॅप्सायसिन नावाचं तत्त्व असतं. जे त्वचेचा अनेक समस्यांपासून बजावण्यात मदत करतं. अपचनाचा त्रास असेल तर सिमला मिरची खावी.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Health Tips, Vegetables

    पुढील बातम्या