पुरुषांमध्ये गर्भधारणेची लक्षणं दिसण्याला कोवाड सिंड्रोम (Couvade Syndrome) असं म्हटलं जातं. काही पुरुषांवर पत्नीच्या गर्भधारणेचा परिणाम इतका होतो की, त्यांना देखील तिच्या प्रमाणेच लक्षणं जाणवायला लागतात. यालाच सहानुभूती गर्भावस्था म्हटलं जातं. मात्र, हा कोणताही आजार नाही.
लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या एका अभ्यासानुसार या सिंड्रोममध्ये पुरुषांना महिलांप्रमाणेच पोटदुखी, पोट फुगणं, पाठदुखी, आळस येणं, मॉर्निंग सिकनेस, दातदुखी, जास्त भूक लागणं अशी लक्षणं जाणवायला लागतात. याशिवाय डिप्रेशन येणं, स्ट्रेस, स्मरणशक्ती कमी होणं अशीही लक्षणं दिसतात.
ज्या पतीला पत्नीला होणार्या बाळाबद्दल मनातून फारच सहानुभूती निर्माण व्हायला लागते. त्यांच्यामध्ये कौवॉड सिंड्रोम दिसायला लागतात. शिवाय होणार्या बाळाबद्दल जास्त विचार केल्यामुळे देखील ही लक्षणं दिसतात. ही लक्षणं बाळाच्या जन्मानंतरही दिसू शकतात.
पुरुषांमध्ये दिसणारी लक्षणं शक्यतो विकसित देशांमध्ये दिसून आली आहेत. एका अभ्यासनुसार अमेरिका, स्विडन, ब्रिटन इथल्या पुरुषांमध्ये अशी लक्षणं दिसून आलीत. एकमेकांबद्दल प्रेम आणि ओढ, हार्मोनल चेंजेस यामुळे अशी लक्षणं दिसतात असं मानलं जातं.
मानोसोपचार तज्ज्ञांच्यामते महिलांच्या प्रजनन क्षमतेबद्दल पुरुषांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. येणाऱ्या बाळाबद्दल जास्त विचार चिंता,गर्भधारणेच्या काळात पत्नीबरोबर मतभेद यामुळे पुरुषांच्या मनावर परिणाम होतो.
यापुढे आपली पत्नी बाळाकडे जास्त लक्ष देईल या भावेतून काही पुरुषांच्या मनात येणाऱ्या बाळाबद्दल द्वेष निर्माण होतो. मानोसोपचार तज्ज्ञांच्यामते कौवॉड सिंड्रोम म्हणजे एक सुरक्षात्मक कवच देखील असू शकतं.
पुरुषांना आपल्या पत्नी बद्दल अतीप्रमाणात ओढ असते त्यांना आपल्या बाळाबद्दल देखील तितकीच ओढ आणि काळजी वाटत राहते. त्यामुळे कौवॉड सिंड्रोम दिसायला सुरुवात होते. पत्नीचं लक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त असावं या भावनेमधून देखील ही लक्षणं निर्माण होतात.
काही पुरुष वडील होण्याचा जास्त ताण घेतात. कोवाड सिन्ड्रोमचा संबंध हार्मोन बदलाशी आहे. या संदर्भामध्ये 2002 ते 2001 या वर्षभरामध्ये अभ्यास केला गेला आहे. अभ्यासानुसार पुरुषांमध्ये प्रोलॅक्टीन आणि एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये वाढतो. त्यानंतर टेस्टोस्टेरॉन आणि स्ट्रेस निर्माण करणारे हार्मोन्स कॉर्टिसॉल कमी व्हायला लागतात.