• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कसं शक्य आहे? मधमाश्या तयार करू लागल्या निळ्या रंगाचं मध

कसं शक्य आहे? मधमाश्या तयार करू लागल्या निळ्या रंगाचं मध

मधमाश्यांनी अचानक निळ्या मधाची (Blue Honey) निर्मिती सुरू केल्याचं मधमाशी पालकांना (Honey Beekeepers) दिसलं. पडताळणी केली असता त्यांनी जे पाहिलं ते आश्चर्यकारक होतं.

  • Share this:
पॅरिस, 12 जून : जगभरातून मधाला (Honey) मोठी मागणी असते. हे मध केवळ मधमाश्या निर्माण करू शकतात. सोनेरी रंगाचं मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातं. परंतु निळ्या रंगाचं मध (Blue Honey) कधी ऐकलं आहे का? या निळ्या रंगाच्या मधाची  निर्मिती देखील मधमाशाच (Honey bee) करतात. मजेदार गोष्ट अशी की मधमाशांनी अचानक निळ्या रंगाच्या मधाची निर्मिती सुरू केल्याचं योगायोगाने मधमाशी पालकांनी (Honey Beekeepers) पाहिलं. पडताळणी केली असता त्यांनी जे पाहिलं ते आश्चर्यकारक होतं. 2012 मध्ये ईशान्य फ्रान्समधील (France) मधमाशी पालकांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडील मधमाशांनी अचानक रहस्यमय पद्धतीनं निळ्या रंगाच्या मधाची निर्मिती सुरू केली आहे. रिबेयूविले भागातील मधमाशी पालकांनी पाहिलं की त्यांच्याकडील मधमाशा एक असामान्य रंगीत पदार्थ घेऊन पोळ्याकडे परतत आहेत. त्यामुळे त्यांच्या मधाचा रंग अनैसर्गिक निळा झाला. हे वाचा - OMG! हे डोले-शोले माणसाचे नाही तर प्राण्याचे; कोण आहे हा Bodybuilder animal पाहा हे सर्व का आणि कसं घडतं याची पडताळणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न या मधमाशीपालकांनी केला. काही महिन्यांनंतर याचं कारण त्यांना सापडलं. मधमाशा परिसरातील बायोगॅस संयंत्रातील (Biogas System) कचरा खात असल्याने त्यांच्या मधाचा रंग बदलल्याचं मधमाशी पालकांना दिसून आलं. हा बायोगॅस प्लॅंट रंगीत चॉकलेट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या संयंत्रातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करत होता. कंपनीने हे रोखण्यासाठी तात्काळ पावलं उचलली आणि ज्या कचऱ्यावर मधमाशा येऊन बसत होत्या तो कचरा लीक होण्याची प्रक्रिया बंद केली. त्यानंतर या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. हे मध विक्रीयोग्य नसतं. तसंच यामुळे मधमाशा मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण वाढत असल्याने मधमाशी पालकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं. फ्रान्स हा देश युरोपातील सर्वात मोठा मध उत्पादक (Honey Producer) देश आहे. मधमाशांची संख्या वाढावी यासाठी फ्रान्स सरकारने यापूर्वीच कीटकनाशकं वापरावर निर्बंध लावले आहेत. हे वाचा - WOW! सुकलेल्या पानाचं चक्क बनलं सुंदर फुलपाखरू; विश्वास बसत नाही मग पाहा VIDEO आश्चर्यकारक बाब म्हणजे यापूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून निळ्या मध उत्पादनाविषयी बातम्या आल्या होत्या. याची पडताळणी केली असता स्पष्ट झाले की मधमाशा असे परागकण वेचत होत्या की ज्यांचा रंग निळा होता. काही संशोधन असंही सांगतं की काही फुलांचे परागकण हे निळ्या रंगाचे असतात. एका घटनेत असे दिसून आले की मधमाशा नजीकच्या वाईन फॅक्टरीतून परागकण वेचून आणत होत्या. निळे मध हे अजून एका प्रकारे तयार केलं जातं. यासाठी मशरूम (Mushroom) मध्ये मध मिसळलं जातं. काही वेळेनंतर मशरुममधून मध फिकट निळा रंग घेतं आणि मध फिकट निळ्या रंगाचा होतो. परंतु, यासाठी या खास मशरुमला किमान 2 महिनेतरी मधात ठेवावा लागतं.
Published by:Priya Lad
First published: