जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं .

चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं .

चहाबरोबर (Tea time snacks) चटपटीत म्हणून तुम्हीही यातल्या काही गोष्टी खायची चूक तर करत नाही ना? पोटाला होईल त्रास.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 25 मे : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी संध्याकाळी किंवा सकाळी उठल्या नंतर चहा **(**Tea)  पिऊन दिवसाची सुरुवात करणारे चहा शौकीन लोक आपल्या आजुबाजूला नक्कीच असतील. काही लोकांना चहाबरोबर बिस्किटं किंवा काहीतरी चटपटीत खायला आवडतं. पण, चहाबरोबर काही ठराविक गोष्टींचं सेवन केल्याने आपण आजाराला निमंत्रण देत असतो. चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं (****Stomach Problems). अपचन आणि ऍसिडीटी **(**Acidity) सारख्या समस्या सुरु होतात. चहाबरोबर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेऊयात. बेसन पिठाचे पदार्थ बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही  होऊ शकतो. कच्चे पदार्थ सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं. ( कोरोना घटला तरी पुणे, नागपूर, मुंबईची चिंता कायम; आता नव्या आजाराचा प्रकोप ) थंड पदार्थ चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऍसिडीटी, अपचन सारखा त्रास होतो. त्यामुळे तहान लागली असेल तर, चहा पिण्याआधी पाणी प्यावं. ( VIDEO: अल्पवयीन मुलाला अधिकाऱ्यांकडून मारहाण; कारण ऐकून आयुक्तही वैतागले ) आंबट पदार्थ टाळा काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावा आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत. ( लॉकडाऊनमध्ये बुधवार पेठ कोलमडलं; नवी संधी शोधणाऱ्या दोघींची प्रेरणादायी कथा ) हळद घातलेले पदार्थ चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात