मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कोरोना घटला तरी पुणे, नागपूर, मुंबईची चिंता कायम; आता नव्या आजाराचा प्रकोप, परिस्थिती भयंकर

कोरोना घटला तरी पुणे, नागपूर, मुंबईची चिंता कायम; आता नव्या आजाराचा प्रकोप, परिस्थिती भयंकर

Mucormycosis in Mhaharshtra - एकिकडे कोरोना रुग्ण संख्या घटते आहे तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत.

Mucormycosis in Mhaharshtra - एकिकडे कोरोना रुग्ण संख्या घटते आहे तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत.

Mucormycosis in Mhaharshtra - एकिकडे कोरोना रुग्ण संख्या घटते आहे तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 मे : एकिकडे राज्यातील कोरोना प्रकरणं (Coronavirus in Maharashtra) कमी होत असताना मोठा दिलासा मिळतो आहे. कोरोनावर नियंत्रण मिळत असतानाच आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना रुग्णसंख्या घटत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. 7 जिल्ह्यांची परिस्थिती तर भयंकर आहे.

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायसिसने शिरकाव केलेला आहे. आतापर्यंत एकूण 2113 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 120 मृत्यू झाले आहेत. फक्त 213 रुग्ण बरे 1780 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. म्युकोरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले आहेत. पुण्यात कोरोनाचे रुग्णही जास्त होते. पुण्यानंतर  नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदनगर यांचा क्रमांक लागतो. तर सांगली, औऱंगाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्येही परिस्थिती गंभीर आहे. मृत्यूच्या बाबतीत म्हणायचं तर पुण्यातच सर्वाधिक मृत्यू झाले आहे. त्यानंतर नांदेडमध्ये सर्वात जास्त मृत्यूची नोंद आहे.

हे वाचा - होम आयसोलेशन पूर्णपणे बंद, कोविड सेंटरमध्ये व्हावे लागणार दाखल - राजेश टोपे

कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी म्युकोरमायकोसिसशी लढण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहे, याबाबत राज्य सरकारने माहिती दिली आहे.

म्युकरमायकोसिसवरील औषधासाठी जागतिक निविदा

या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरलं जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केलं जात आहे. ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचं वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार

म्युकरमायकोसिस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालयं नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 220 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हे वाचा - 70 च्या महिलेला दिलेल्या 2-DG औषधाचा जबरदस्त परिणाम, एका तासात ऑक्सिजन लेव्हल 94

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Mumbai, Nagpur, Pune