पुणे, 25 मे : कहर माजवणारा कोरोना आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने लावलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पण तरीही विपरीत परिस्थितीत आयुष्य बदलण्याची संधी समजून अनेकांनी हा संघर्ष आपलासा केला. आयुष्य जगण्यासाठी नवे पर्याय आत्मसात केले. चांगलं वाईट यांच्या कल्पनांच्या पलीकडे आयुष्य जगणार्यासाठी तर कोरोनाचा हा काळ जीवघेणा ठरला आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेकांची प्रचंड ससेहोलपट झाली आहे. कोरोना पेक्षा रोजच्या जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. पुण्यातल्या बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिला लॉकडाऊनच्या काळात पुरत्या कोलमडून गेल्या होत्या. मात्र अनेक सेवाभावी संस्था या काळात या महिलांच्या मदतीसाठी पुढे आल्या. त्यातल्या अनेक महिलांना पर्यायी रोजगार देण्याचे ही प्रयत्न झाले. मात्र पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर यातल्या काही जणी पुन्हा देह विक्रेयाच्या व्यवसायात परत आल्या. हे ही वाचा- पुण्यात Lockdown मध्ये क्रिकेटची हौस पडली महागात; थेट 11,500 रुपयांचा दंड मात्र काही जणी या पर्यायी रोजगारात टिकून राहिल्या. यातीलच एक आहे आशा (नाव बदलेल आहे ) लॉकडाऊन झाल्यानंतर आशाचा देहविक्रय करायचा व्यवसाय बंद पडला आणि तिच्यासह कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली होती. मात्र समुपदेशन केल्यानंतर आशा हिने स्वयंपाक करून डबे द्यायला सुरुवात केली. तिच्या सोबतीला आणखी एक तिच्यासारखी देहविक्री करून उपजीविका करणारी सरिता ही या उपक्रमात सहभागी झाली. या व्यवसायातून ही त्यांना फार उत्पन्न मिळतय अशातला भाग नाही. पण सन्मान मिळत असल्याचं समाधान मोठ असल्याचं आशा आणि सरिता सांगतात. तेजस्वी सेवेकरींसारख्या अनेक कार्यकर्त्या या काळात या महिलांच्या मदतीसाठी काम करताहेत. किमान वय झालेल्या किंवा फारसा प्रतिसाद नसलेल्या महिला नवीन काम करायला लवकर तयार होतात असा त्यांचा अनुभव आहे. रोजच्या जगण्यासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांना जेव्हा सन्मानाने जगायची संधी उपलब्ध होते तेव्हा त्या ही योग्य समुपदेशन झाल्यानंतर पुन्हा देहविक्रय करण्यासाठी जात नाहीत हे स्पष्ट आहे. संघर्ष सगळीकडेच आहे पण संघर्षात संधी शोधून आयुष्यातल्या महत्वाच्या बदलला सामोरं जाणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यासाठी आशा आणि सरिताच अभिनंदन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.