या व्हिडिओबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. राज्य सरकारनं लक्षणे नसलेल्या लोकांची कोरोना चाचणी न करण्याच्या सूचना दिलेल्या असताना या मुलावर चाचणी करण्यासाठी इतका दबाव का टाकला जातोय, असा सवाल उपस्थित होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांनी अशी तक्रारही केली आहे, की आम्हाला चाचणी करायची असतानाही अधिकाऱ्यांनी लक्षणं नसल्याचं सांगत चाचणी करण्यास नकार दिला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना बीबीएमपी आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले, की याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ते म्हणाले, की बीबीएमपी अधिकारी लोकांना कोरोना चाचणीची सक्ती करू शकत नाहीत. हा व्हिडिओ व्हायरल होताच याच परिसरातील असेच काही व्हिडिओ अनेकांनी शेअर केले आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये काही अधिकारी एका व्यक्तीला धक्के देत बाहेर काढत असल्याचं दिसत आहे.This teenager is beaten only to go for #COVID19 testing in #Bangalore ,Boy saying he has no symptoms of infection but officials compelling and beating #coronavirus pic.twitter.com/PfZmoiknoD
— Ashraf Wani اشرف وانی (@ashraf_wani) May 24, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.