जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नको कलर, नको मेहंदी; फक्त एक गोष्ट करा केस काळे झालेच समजा

नको कलर, नको मेहंदी; फक्त एक गोष्ट करा केस काळे झालेच समजा

चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे यातील पॉलिफिनॉलमुळे केसांचं इन्फेक्शन कमी होतं. इन्फेक्शनमुळे केसांवरील त्वचा निघत असेल तर त्रास कमी होतो.

चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे यातील पॉलिफिनॉलमुळे केसांचं इन्फेक्शन कमी होतं. इन्फेक्शनमुळे केसांवरील त्वचा निघत असेल तर त्रास कमी होतो.

संशोधकांनी केलेला हा दावा (Research Study) अजब असला तरी, केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त लोकांना दिलासा देणारा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 3 जुलै : मनावरचा ताणव वाढला की शरीरात अनेक प्रकारच्या समस्या दिसायला लागतात. तणावाचा आरोग्याबरोबर केस आणि त्वचा देखील परिणाम (Stress effect on hair & skin) होतो. ताणतणावाने केस कायमचे पांढरे होतात हे तर,सगळ्यांना माहिती आहे. पण संशोधनी केलेल्या दाव्यानुसार तणाव कमी झाल्या पांढरे केस पुन्हा काळे (Black) होऊ शकतात. न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये (Columbia University, New York**)** झालेल्या या अभ्यासानुसार, मानसिक तणावामुळे पांढऱ्या झालेल्या केसांच्या बदलासंदर्भात पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या अभ्यासानुसार मेंदूवरचा ताण संपल्यानंतर संशोधनात (Research Study) सहभागी झालेल्यांचे केस पुन्हा काळे होऊ लागले. आधी उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनात स्ट्रेस (Stress) संपला तरी सफेद झालेले केस परत काळे होत नाहीत हे स्पष्ट झालं होतं. पण, नुकतंच करण्यात आलेलं संशोधन अगदी वेगळं आहे. त्यामुळे संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ( केसांसाठी चहा पावडर वापरून तर बघा; केस वाढतील दुपटीने ) संशोधकांच्या मते मानवी वाढ ही स्थायी किंवा जैविक क्रिया नाही. ती थांबविली जाऊ शकते किंवा तात्पुरती बदलली जाऊ शकते. केसांमध्ये एक जैविक इतिहास लपलेला आहे. जेव्हा केस त्वचेच्या आवरणाखाली असतात तेव्हा त्यांच्यावर तणावाचा परिणाम होतो. त्वचेतून बाहेर पडल्यावर फिक्स होतात. शास्त्रज्ञांच्या मते तणावात असताना मायटोकोन्ड्रिया ज्याला मानवी पेशींचं पावरहाऊस म्हटलं जातं त्यात बदल होतात. ज्यामुळे केसांमध्ये आढळणारे शेकडो प्रोटीन बदलतात आणि काळे केस पांढरे होतात. ( भाज्या खा पण जरा जपून; अतिसेवनाने देखील होतात वाईट परिणाम ) या संशोधनात 14 व्हॉलेंटियरचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्याती स्ट्रेस लेव्हलचा विचार करता एक व्हॉलेंटीयर सुट्टीवर असताना त्याचे 5 पांढरे केस पुन्हा काळे झाल्याचं लक्षात आलं. म्हणजे केसांचा रंग बदलला तेव्हा केसांचे 300 प्रोटिन बदलले. तणावात असताना CDK नावाचं विशेष प्रोटीन सेलला डॅमेज करायला सुरूवात करतं. व्यक्ती तणावात असताना CDK वेगाने तयार होतं. ( स्वयंपाकाच्या गॅसची बचत करण्यासाठी वापरा या टिप्स, जास्त दिवस टिकेल LPG सिलेंडर ) त्यामुळे तणावामुळे काळे केस पांढरे होतात.जेव्हा आपण तणाव आणि चिंतेत असतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं. केस आणि शरीराचा रंग राखण्यात मदत करणाऱ्या पेशींवर वाईट परिणाम करतं. केसं काळे होण्याची ही क्रिया काही ठरावी काळात होते. त्यामुळे तणाव कमी केल्याने 70 वर्षांच्या म्हातारीचे सफेद केस काळे होत नाहीत किंवा 10 वर्षाच्या मुलाने स्ट्रेस घेतल्याने त्याचे केसं सफेद होणार नाहीत. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात