मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /LPG च्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, या टिप्स फॉलो करून करा स्वयंपाकाच्या गॅसची बचत

LPG च्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, या टिप्स फॉलो करून करा स्वयंपाकाच्या गॅसची बचत

स्वयंपाकाच्या गॅसच्या (Cooking Gas) किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महिन्याचं बजेट (Budget) कोलमडतं. त्यामुळे गॅसची बचत (Saving) करणं अत्यावश्यक आहे. तुमच्या घरातही स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं.

स्वयंपाकाच्या गॅसच्या (Cooking Gas) किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महिन्याचं बजेट (Budget) कोलमडतं. त्यामुळे गॅसची बचत (Saving) करणं अत्यावश्यक आहे. तुमच्या घरातही स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं.

स्वयंपाकाच्या गॅसच्या (Cooking Gas) किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महिन्याचं बजेट (Budget) कोलमडतं. त्यामुळे गॅसची बचत (Saving) करणं अत्यावश्यक आहे. तुमच्या घरातही स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं.

    नवी दिल्ली, 24 जून: स्वयंपाकाच्या गॅसच्या (Cooking Gas) किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महिन्याचं बजेट (Budget) कोलमडतं. त्यामुळे गॅसची बचत (Saving) करणं अत्यावश्यक आहे. तुमच्या घरातही स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. गॅस वाया जाणार नाही, अशा पद्धतीने वापरणं ही घरातल्या फक्त महिलांची जबाबदारी आहे, असं गृहीत धरलं जातं; मात्र तसं नाही. ही कुटुंबातल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. घरातल्या पुरुषांनी, किशोरवयीन मुलांनीही या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. गॅस वापरण्याच्या काही क्लृप्त्या वापरल्या तर गॅसची बचत होऊ शकते. त्यासाठीच्या काही क्लृप्त्या आपण पाहू या.

    कडधान्य-डाळी शिजवण्यापूर्वी भिजत ठेवा- डाळी, हरभरे, राजमा, तांदूळ ही कडधान्यं-धान्यं शिजवण्याआधी किमान अर्धा तास भिजवून ठेवावीत. त्यामुळे ते शिजवण्यासाठी गॅस कमी लागेल आणि पदार्थ तयार होण्याचा कालावधीही कमी होईल.

    आवश्यक साहित्य जवळपास बाळगा- स्वयंपाक तयार करताना आपल्याला जे घटक, वस्तू, पदार्थ लागणार आहेत, ते सगळे गॅस शेगडी पेटवण्याआधीच जवळ आणून ठेवावेत. तयारी पूर्ण झाल्यानंतरच गॅस शेगडी प्रज्ज्वलित करावी. त्यामुळे गॅस विनाकारण जळत नाही. गॅस पेटवल्यानंतर त्याचा पुरेपूर उपयोग होतो आणि स्वयंपाक करतानाचा वेळही वाचतो.

    हे वाचा-मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर

    प्रेशर कुकरचा करा वापर- प्रेशर कुकरचा वापर बहुतेकशा घरांत केला जातो; मात्र तुम्ही कुकर वापरत नसाल तर तो जरूर वापरा. कारण कुकरमध्ये वाफेवर अन्न लवकर शिजतं. त्यासाठी गॅस कमी लागतो.

    आवश्यकतेनुसार पाणी वापरा- पदार्थ शिजवताना त्यामध्ये आवश्यकतेएवढंच पाणी (Water) घालावं. जास्त पाणी घातलं, तर पदार्थ तयार व्हायला अधिक वेळ लागतो. तसंच, ते पाणी आटण्यासाठी गॅस जास्त खर्च होतो.

    भांड्यावर झाकण ठेवून शिजवा अन्न- अनेकांना भांड्यावर झाकण (Lid) न ठेवता शिजवण्याची सवय असते. मात्र त्यामुळे गॅस जास्त खर्च होतो. भांड्यावर झाकण ठेवलं, तर त्यातल्या ऊर्जेचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर पदार्थ शिजण्यासाठी केला जातो. त्यामुळे साहजिकच गॅस कमी प्रमाणात लागतो आणि बचत होते.

    हे वाचा-नाश्त्याला खा हे 5 पदार्थ; दिवसभर नाही जाणवणार थकवा

    मध्यम आचेवर अन्नधान्य शिजवा- खाद्यपदार्थ शिजवताना तो लवकर होण्यासाठी गॅस मोठा करण्याची सवय अनेकांना असते. मात्र त्यामुळे गॅस जास्त प्रमाणात खर्च होतो. शिवाय थोडं दुर्लक्ष झालं, तर पदार्थ भांड्याला चिकटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पदार्थ कायम मध्यम आचेवरच शिजवावेत. त्याने गॅसची बचत होतेच, शिवाय पदार्थ भांड्याला चिकटण्याची शक्यताही फार कमी होते.

    फ्रीजमधीन अन्नधान्य गरम करताना हे लक्षात ठेवा- फ्रीजमधले (Refrigerator) पदार्थ स्वयंपाकासाठी वापरायचे असतील किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध तापवायचं असेल, तर ते आधी थोडा वेळ फ्रीजबाहेर काढून ठेवावं. ते पदार्थ किंवा दूध नॉर्मल तापमानाला आल्यानंतर ते गरम करायला ठेवावं. त्यामुळे गॅसची बचत होते.

    First published:

    Tags: Lifestyle, LPG Price, Money