नवी दिल्ली, 27 एप्रिल : फिटनेस ट्रेनिंग किंवा स्पोर्ट्स कोचिंगसाठी कुठेही गेलात तरी तुमचे फिटनेस प्रशिक्षक तुम्हाला व्यायाम किंवा वर्कआउट सुरू करण्यापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग करण्यास सांगतात. तुम्ही जिममध्ये जात नसला तरी स्ट्रेचिंगला रोज करायलाच हवे. तज्ज्ञांच्या मते, स्ट्रेचिंग करताना शरीराच्या खालच्या अंगांकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे पिंडऱ्या, हॅमस्ट्रिंग्स, ओटीपोटात हिप फ्लेक्सर्स आणि मांडीच्या पुढच्या बाजूला क्वाड्रिसेप्स. हे सर्व शरीराचे अवयव तुमच्या चालण्यात आणि प्रत्येक हालचालीत महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय खांदे, मान आणि पाठीचा खालचा भाग स्ट्रेच करणे फायदेशीर (Stretching health tips) आहे. फिटनेस तज्ज्ञ दररोज किंवा आठवड्यातून किमान तीन किंवा चार वेळा स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला देतात. स्ट्रेचिंगमुळे तुम्हाला शारीरिक हालचालीसाठी तयार होण्यास मदत होतेच, परंतु पाठदुखी आणि दिवसभरातील ताणही कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला झोपही चांगली लागू शकते. स्ट्रेचिंग का महत्त्वाचं आहे याच्या 5 कारणांवर एक नजर टाकूया. ऊर्जा पातळी वाढते - सकाळी काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यास दिवसभर ऊर्जा ठिकण्यास मदत होईल. काही मिनिटांचे स्ट्रेचिंग, ज्यामध्ये एखादा खेळ खेळल्याप्रमाणे मुमेंट करणाऱ्या हालचालींचा समावेश होतो. यामुळे मेंदूची शक्ती वाढू शकते, रक्त प्रवाह सुधारतो. मध्यान्ह दुपारच्या सुस्तीवर मात करण्यास मदत करू शकतो. कामांमध्ये वेग - स्ट्रेचिंगमुळे आपण कामे अधिक गतीने वेगात करू शकतो. खांद्याच्या ब्लेडला ताणून वरच्या शेल्फवर वस्तूपर्यंत पोहोचण्यास मदत होते. वृद्धापकाळात नाहीशी होणारी लवचिकता स्ट्रेचिंगमुळे टिकवून ठेवण्यास मदत होते. सांधे कडक होणे आणि वेदना टाळण्यासाठी स्ट्रेचिंगचा फायदा होतो. हे वाचा - Horoscope : ज्याची प्रतीक्षा होती ते घडणार; निसटून गेलेली ती संधी पुन्हा मिळणार एकूण आरोग्य फायदे - साध्या स्ट्रेचिंगमुळे रक्त परिसंचरण सुधारते, शरीरातील रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा घरून काम करत असाल - तासनतास डेस्कवर बसणे तुमच्या मानेसाठी आणि इतर सांध्यांसाठी वाईट आहे. कार्यालयीन कर्मचार्यांसाठी स्ट्रेचिंगमुळे काम आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते आणि तीव्र मध्यम ते तीव्र मान किंवा खांद्याचे दुखणे कमी होते. चांगले संतुलन - जर तुम्हाला वृक्षासनासारखी योगासने सहजतेने करायची असतील, तर तुम्हाला तुमच्या शरीराचे संतुलन सुधारावे लागेल, स्ट्रेचिंगमुळे ते शक्य होईल. स्ट्रेचिंगमध्ये केवळ स्नायूच नव्हे तर सांधे देखील फिट राहतात. त्यामुळे संतुलन राखण्यास मदत होते. हे वाचा - ज्या स्त्रिया माता बनू शकत नाहीत त्यांना हार्ट फेलचा धोका सर्वाधिक झोप - तुमच्या स्नायूंना ताण येत असेल, तर स्ट्रेचिंगमुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. स्ट्रेचिंगमुळे झोप आरामदायी येते यात शंका नाही. यामुळे रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (restless legs syndrome) च्या वेदना कमी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.