नवी दिल्ली, 27 एप्रिल : उन्हाळ्यात दुधी भोपळा (Gourd ) बाजारात खूप बघायला मिळेल, पण काही लोकांना दुधी अजिबात आवडत नाही. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात दुधी नक्की खायला हवा, दुधी भोपळा खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी खूप उपयुक्त आहे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. छातीत जळजळ, शरीरात पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे चक्कर येणे, धाप लागणे अशा अनेक समस्यांवर दुधी भोपळा फायदेशीर आहे. जाणून घेऊया दुधी खाण्याचे 5 महत्त्वाचे (Gourd Benefits For Health) फायदे. 1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठीही दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. दुधीमध्ये व्हिटॅमिन-सी, सोडियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. दुधी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते. 2. हाडे मजबूत राहतील - दुधी आहारात घेतल्याने हाडे मजबूत होतात. कारण त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक सारखे पोषक घटक आढळतात, हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. 3. हृदयविकाराचा धोका - दुधी भोपळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, याबद्दल अनेकांना माहीत नाही. दुधी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल संतुलित राहते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. हे वाचा - किडनी, फुफ्फुस निकामीही करू शकतो मलेरिया; वेळीच करा उपचार, काय आहेत लक्षणं 4. केसांसाठी देखील उपयुक्त - याशिवाय केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येतही तुम्हाला फायदा होऊ शकतो. केसांसाठी दररोज एक ग्लास दुधीचा रस प्यायल्यास फायदा होतो. केसांची वाढ चांगली होऊन केस अकाली पांढरे होत नाहीत. हे वाचा - कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी ही एक गोष्ट आहे वरदान! आहारात प्रत्येकानं घ्यायला हवी 5. तणाव देखील कमी होईल - बदलत्या जीवनशैलीत बहुतेक लोक ताण-तणावाखाली काम करत असतात. त्यामुळे अनेक आजार सुरू होऊ शकतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव देखील कमी होतो. त्यामुळे आजपासून दुधी भोपळ्याचा आहारात नक्की समावेश करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.