Home /News /lifestyle /

WWE हेवीवेट द ग्रेट खली नेमकं खातो तरी काय? त्याने स्वत:च सांगितल्या हेल्थ टिप्स

WWE हेवीवेट द ग्रेट खली नेमकं खातो तरी काय? त्याने स्वत:च सांगितल्या हेल्थ टिप्स

वर्षानुवर्षे एक प्रश्न लोकांच्या मनात आहे की एवढी मोठी बॉडी राखण्यासाठी ग्रेट खली काय खातो? अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, खलीने त्याच्या रोजच्या आहाराबद्दल खुलासा करून सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

  नवी दिल्ली, 24 मे : भारतात क्वचितच असा कोणी असेल ज्याने द ग्रेट खलीबद्दल (The Great Khali) ऐकले नसेल. या दिग्गज पैलवानाच्या परिचयाची गरज नाही. दलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली आजही जगातील सर्वात प्रसिद्ध कुस्तीपटूंपैकी एक मानला जातो. 2006 मध्ये WWE ची सुरुवात झाल्यापासून खली हे भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. 7 फूट 2 इंच उंच आणि 157 किलो वजन असलेल्या या कुस्तीपटूने WWE चे वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशीप पटकावले होते. वर्षानुवर्षे एक प्रश्न लोकांच्या मनात आहे की एवढी मोठी बॉडी राखण्यासाठी ग्रेट खली काय खातो? अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, खलीने त्याच्या रोजच्या आहाराबद्दल खुलासा करून सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो काय म्हणाला ऐकूया.
  या व्हिडिओमध्ये द ग्रेट खली म्हणत आहे की, "अनेक लोकांचा प्रश्न आहे की, माझा आहार काय आहे. ही पहा फळे, चिकन सॉसेज, अंडी, ब्रेड, केळी, सफरचंद आणि हे नाशपाती." एक व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून खलीला रिंगमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भरपूर आहार आणि खूप व्यायामाची गरज आहे. यापूर्वी, दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये या व्यावसायिक कुस्तीपटूने सांगितले होते की, तो नेहमीच प्रथिनेयुक्त आहार घेत असतो.
  खलीने या व्हिडिओमध्ये सांगितले की तो आपल्या आहारात अंडी आणि अंजीर घेतो, दोन्हीमध्ये प्रथिने भरपूर असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंड्यातील फक्त पांढरा भाग (प्रोटीन), अंड्यातील पिवळा भाग ज्याला अंड्यातील पिवळा बलक म्हणतात ते खाणे टाळावे, कारण त्यात कोलेस्ट्रॉल असते, असा सल्लाही त्याने अंडी खाणाऱ्यांना दिला आहे. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार यापूर्वी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत खलीने सांगितले होते की, त्याच्या आहारात चिकन, अंडी, तांदूळ आणि डाळी यांचाही समावेश आहे. या गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट, चरबी, प्रथिने आणि फायबर यांचे निरोगी मिश्रण आहे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम तरुणांसाठी सल्ला - या मुलाखतीत खलीने तरुणांना फिटनेसचा सल्ला देताना सांगितले की, “आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी आपण काय खात आहोत, याबाबत सतर्क राहायला हवे? तसेच, फिटनेसची विशिष्ट पातळी गाठण्यासाठी शॉर्टकट घेण्यावर माझा विश्वास नाही. चांगले शरीर तयार करण्यासाठी, आपल्याला वेळ आणि मेहनत दोन्ही गुंतवणे आवश्यक आहे. बॉडी बनवण्यामध्ये असे काहीही नाही जे तुम्हाला रातोरात मजबूत करेल, त्यात कोणताही शॉर्टकट नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Health Tips

  पुढील बातम्या