Home /News /lifestyle /

World Earth Day 2022: उद्या कदाचित श्वास घेणं मुश्कील होईल; वसुंधरेची काळजी प्रत्येकाची जबाबदारी

World Earth Day 2022: उद्या कदाचित श्वास घेणं मुश्कील होईल; वसुंधरेची काळजी प्रत्येकाची जबाबदारी

World Earth Day 2022: हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिवस म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, लोकांना पृथ्वीचे महत्त्व समजावे आणि पर्यावरण अधिक चांगले राखण्यासाठी जागरूक व्हावे.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day 2022) म्हणजेच जागतिक पृथ्वी दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून कोट्यवधी लोक पृथ्वीशी संबंधित पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येतात. हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण आणि जैवविविधता संवर्धनासाठी अधिक जागरूक होणं गरजेचं असून आणि प्रत्यक्ष प्रयत्नांना गती देण्याचा उद्देश असतो. हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिवस म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, लोकांना पृथ्वीचे महत्त्व समजावे आणि पर्यावरण अधिक चांगले राखण्यासाठी जागरूक व्हावे. यामुळेच या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. झाडे लावणे, रस्त्यालगतचा कचरा उचलणे, लोकांना शाश्वत जीवन जगण्याचे मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. याशिवाय शाळा आणि विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवसाचे महत्त्व - 1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. जैवविविधतेचे नुकसान, वाढते प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अर्थ डे ऑर्गनायझेशन (पूर्वीचे अर्थ डे नेटवर्क) तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात 193 देशांतील 1 अब्जाहून अधिक लोकांचा समावेश आहे. हे वाचा - यासाठी उन्हाळ्यात रात्रीसुद्धा अंघोळ करा; कित्येक प्रॉब्लेम्स होण्यापूर्वीच टाळा 2022 वर्षाची थीम काय? यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम 'Invest in our earth' अशी आहे. म्हणजे 'आपल्या पृथ्वीवर गुंतवणूक करा'. म्हणजे पृथ्वीसाठी, पर्यावरणासाठी धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्यपूर्ण गोष्टी करणं आणि समानतेने अंमलबजावणी करणं. याआधी 2021 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती 'रिस्टोर अवर अर्थ' आणि 2020 ची थीम 'क्लायमेट अॅक्शन' होती. हे वाचा - पाळीदरम्यानच्या अतिरक्तस्रावाकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतं ब्लड कॅन्सरचं लक्षण जागतिक वसुंधरा दिवस जागतिक स्तरावर 192 देशांद्वारे साजरा केला जातो. 60-70 च्या दशकात जंगले आणि झाडांची अंदाधुंद कत्तल पाहता, सप्टेंबर 1969 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन येथे एका परिषदेत, विस्कॉन्सिनचे अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. या देशव्यापी जनआंदोलनात अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेतला. आणि या परिषदेत 20 हजारांहून अधिक लोक जमले होते. हा दिवस 1970 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. पर्यावरण अबाधित राखणं हे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचं काम आहे. पर्यावरणाचा विचार न करता केलेली कामं, विकास हा आपल्यावर नक्की उलटल्याशिवाय राहत नाही. फक्त आर्थिक गोष्टीचा विचार करून पर्यावरण खराब करत गेल्यास त्याचा त्रास आपल्या पुढच्या पिढीला भोगावा लागेल, श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळेल की नाही, इतकी भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही दिवसांपूर्वी दिल्लीत हवा प्रदूषणामुळे झालेल्या परिस्थितीवरून याचा अंदाज येतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Air pollution, Earth, Pollution

    पुढील बातम्या