मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Women Health: पाळीदरम्यानच्या अतिरक्तस्रावाकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतं ब्लड कॅन्सरचं लक्षण!

Women Health: पाळीदरम्यानच्या अतिरक्तस्रावाकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतं ब्लड कॅन्सरचं लक्षण!

एक दिवस कॅथरीनला खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि अचानक बेशुद्ध झाली. तेव्हा तिनं पाळीविषयीचा संकोच बाजूला ठेवत पाळीच्या वेळच्या अतिरक्तस्रावाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. कॅथरीनच्या या निर्णयानेच तिचा जीव वाचवला.

एक दिवस कॅथरीनला खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि अचानक बेशुद्ध झाली. तेव्हा तिनं पाळीविषयीचा संकोच बाजूला ठेवत पाळीच्या वेळच्या अतिरक्तस्रावाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. कॅथरीनच्या या निर्णयानेच तिचा जीव वाचवला.

एक दिवस कॅथरीनला खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि अचानक बेशुद्ध झाली. तेव्हा तिनं पाळीविषयीचा संकोच बाजूला ठेवत पाळीच्या वेळच्या अतिरक्तस्रावाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. कॅथरीनच्या या निर्णयानेच तिचा जीव वाचवला.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 21 एप्रिल : कधी-कधी आपण एखाद्या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेची (women health) कथा इतर स्त्रियांसाठी धडा आहे. तिच्यावर वेळेत उपचार झाल्यानं तिचे प्राण वाचले. डेलीमेलच्या अहवालानुसार, 19 व्या वर्षी कॅथरीन हॉक्सला पाळीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याची समस्या होती. त्या वेळी ती शिक्षणासाठी तिच्या पालकांपासून वेगळ्या शहरात राहत होती. एक दिवस कॅथरीनला खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि अचानक बेशुद्ध झाली. तेव्हा तिनं पाळीविषयीचा संकोच बाजूला ठेवत पाळीच्या वेळच्या अतिरक्तस्रावाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. कॅथरीनच्या या निर्णयानेच तिचा जीव वाचवला. डॉक्टरांनी ती रक्ताच्या कर्करोगानं ग्रस्त असल्याचं निदान केलं. शिवाय, जर आणखी एक आठवडा उशीर झाला असता तर तिचा जीव जाऊ शकला असतं, असंही सांगितलं. कॅथरीनला पाळीच्या वेळेस होणारा अतिरक्तस्राव एक्यूट प्रोमायलोसाइटिक ल्यूकेमियाचं (APL) लक्षण होता. याचं लवकरच रक्ताच्या कर्करोगात रूपांतर होतं. सुरुवातीला, कॅथरीनच्या नेहमीच्या डॉक्टरांनी तिची रक्त तपासणी केली आणि सांगितलं की, ती खूप अशक्त (अ‌ॅनिमिक) आहे. त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात भरती होऊन तातडीनं ट्रीटमेंट सुरू करण्याचा सल्ला दिला. घाबरलेल्या कॅथरीननं तिच्या दोन रूममेट्ससोबत रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी तिला ल्युकेमिया असून लगेच उपचार सुरू करावे लागतील असं सांगितलं. जेव्हा APL होतो तेव्हा अस्थिमज्जा (बोन मॅरो - रक्तपेशींचा स्त्रोत) खूप अपरिपक्व पांढऱ्या रक्त पेशी बनवण्यास सुरुवात करते. यामुळे, इतर निरोगी रक्तपेशी तयार करण्यासाठी शरीरात पुरेशी जागा नसते आणि त्यांची संख्या कमी होते. लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात आणि त्यांच्या अभावामुळं श्वास लागणे आणि सुस्तीची भावना निर्माण होणे अशा समस्या निर्माण होतात. हे प्लेटलेट्सच्या कमतरतेचं लक्षण आहे. डॉक्टरांच्या मते, थकवा आणि त्वचेच्या समस्यांसह पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव हेदेखील APL चं प्रमुख लक्षण आहे. नाक-हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि मासिक पाळीमध्ये असामान्यपणे अचानक बदल हीदेखील गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात. हे वाचा - दिवसभर AC वापरूनही वाढणार नाही विजेचं बिल, जाणून घ्या या खास टीप्स डॉक्टरांचं म्हणणं आहे की, स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळच्या अतिरक्तस्रावाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कॅथरीन म्हणते, सुरुवातीला तिनं तिच्या पाळीकडे लक्ष दिलं नाही. एक दिवस अचानक तिच्या लक्षात आलं की, त्याच्या हाता-पायात गुठळ्या तयार होत आहेत आणि त्वचेचा रंगही बदलू लागला आहे. मासिक पाळीदरम्यान ती बेशुद्ध पडायची. सुरुवातीला तिला वाटलं की तिच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते आणि तेव्हाच तिनं डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांना आढळलं की, कॅथरीनच्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशींची संख्या 186 होती. निरोगी व्यक्तीच्या शरीरात ती 10 असते. पांढऱ्या रक्तपेशींचं एवढं जास्त प्रमाण पाहिल्यानंतर डॉक्टरांनी रक्ताच्या कर्करोगाची शक्यता व्यक्त केली आणि कॅथरीनला तातडीनं रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी प्रथम कॅथरीनची अस्थिमज्जा बायोप्सी केली. कॅथरीनला तत्काळ कॅन्सर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. हे वाचा - प्रयोगशाळेत शुक्राणू पेशी तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश! मानवासाठी ठरणार वरदान डॉक्टरांनी लगेच कॅथरीनची केमोथेरपी सुरू केली. कॅथरीनचे पालकही रुग्णालयात पोहोचले. उपचारादरम्यान, कॅथरीन तब्बल 8 दिवस कोमात राहिली. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिनं पाहिलं की, तिचे लांब जाड केस झपाट्यानं गळू लागले होते. ती खूपच कमकुवत झाली होती आणि तिला स्वतःला ओळखणंही कठीण होत होतं. पण कॅथरीननं धीर सोडला नाही. कॅथरीन नियमितपणे केमोथेरपी करत राहिली. 5 महिने उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी कॅथरीनला सांगितलं की, तिच्यावरचे उपचार यशस्वी झाले असून आता पुन्हा कर्करोग होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तथापि, तिला दर तीन महिन्यांनी तपासणीसाठी येत राहावं लागेल. कॅथरीन स्वतःला भाग्यवान समजते आणि म्हणते की तिनं आणखी काही दिवस तिच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं असतं तर, ती नक्कीच जिवंत नसती. कॅथरीन आता 22 वर्षांची आहे.
First published:

Tags: Cancer, Health Tips

पुढील बातम्या