मुंबई, 21 एप्रिल : उन्हाळ्यात (Summer Health Tips) जास्त घामामुळे शरीराला दुर्गंधी तर येतेच पण त्वचेशी संबंधित अनेक समस्याही सुरू होतात. विशेषत: कडक उन्हात दिवसभर घराबाहेर धावणाऱ्यांना या समस्या अधिक आहेत. बरेचदा लोक ऑफिसला जाण्यासाठी सकाळी लवकर आंघोळ करतात, पण संध्याकाळी घरी परतल्यावर फक्त हात आणि चेहरा धुतात. काही लोक तर घामाचे कपडेही बदलत नाहीत. असे केल्याने तुम्हाला उष्णता तर जाणवेलच पण दिवसभराच्या थकव्यामुळे अंगावर साचलेली घाण, धूळ-माती, घाम यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. वैयक्तिक स्वच्छतेसाठी आंघोळ फार महत्त्वाची आहे. किमान उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी किंवा रात्री पुन्हा एकदा आंघोळ करणे फायदेशीर आहे. रात्री आंघोळीचे अनेक आरोग्य फायदे आहेत, त्याबद्दल जाणून (Many health benefits of bathing at night) घेऊया. उन्हाळ्यात रात्री अंघोळ करण्याचे फायदे चांगली झोप लागते - Brightside.me मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, संध्याकाळी अंघोळ केल्यानं शरीर आणि मनाला आराम मिळतो. त्यामुळे रात्री चांगली झोप येते. झोपेच्या साधारण 90 मिनिटं आधी कोमट पाण्यानं अंघोळ केल्याने तुम्हाला नेहमीपेक्षा 10 मिनिटे लवकर आणि चांगली झोप येण्यास मदत होते. कारण गरम पाणी आपल्या शरीराचे तापमान किंचित कमी करतं. मात्र, उन्हाळ्यात पाणी जास्त गरम करू नका, नाहीतर आंघोळ केलीच नाही असे वाटेल. त्वचा निरोगी राहते - रात्री अंघोळ करून झोपल्यास त्वचा फ्रेश होते. सर्व हानिकारक जंतू आणि बॅक्टेरिया देखील शरीरातून धुऊन जातात, ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते. चेहऱ्याची त्वचा स्वच्छ झाल्यानं मुरुमे, पिंपल्सचा त्रास कमी होतो. तसेच सुरकुत्या, इन्फेक्शन इत्यादी समस्यांपासून बचाव होतो. त्वचेची आर्द्रता टिकून राहते. आंघोळ न करता झोपल्यास केसांमधील घाण उशीवर, नंतर चेहऱ्यावर जाते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्वचा पुन्हा रिकव्हर होत असते. त्यामुळे ती अगोदरपासूनच स्वच्छ असल्यानं नवीन पेशी निरोगी राहतील. अॅलर्जी नाही होणार - धूळ, घाण, प्रदूषण यांची अॅलर्जी असेल तर रात्री बाहेरून आल्यावर आंघोळ केल्याशिवाय झोपू नका. रात्री अंघोळ केल्यानं शरीरावर साचलेली धूळ, माती आणि बॅक्टेरिया धुऊन जातात. याच्या मदतीने तुमच्या बेडशीटवर ऍलर्जी निर्माण करणार्या बॅक्टेरियांमुळे होणारे संक्रमण रोखू शकता. हे वाचा - गॅस, अपचनवर औषधांचा मारा नको; ही 5 फऴं पोटाच्या विकारांवर आहेत फायदेशीर वैयक्तिक स्वच्छता ज्या लोकांना मुरुमे, श्वासाची दुर्गंधी, घामामुळे अंगाला दुर्गंधी येणे, इन्फेक्शन इत्यादी समस्या आहेत, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ नक्की करावी. यामुळे धूळ आणि घाण तर निघतेच पण शरीरातील अतिरिक्त तेलही कमी होतं. कोणत्याही प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच वैयक्तिक स्वच्छताही चांगली राहते. हे वाचा - दातांवर उपचारानंतर भलतंच घडलं; फुफ्फुसाचा रिपोर्ट पाहून रुग्णाला बसला धक्का स्नायूंना आराम मिळतो - दिवसभर धावपळ आणि काम केल्यावर शरीराचे स्नायू थकतात. अशा स्थितीत रात्री कोमट पाण्याने आंघोळ केल्यानं दिवसभराचा थकवा दूर होतो तसेच स्नायूंच्या वेदना कमी होतात. यामुळे रात्री चांगली झोपही येते. रात्रीच्या वेळी कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पाय दुखण्याची समस्या देखील कमी होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.