मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मलायका अरोरासह विराट कोहली पितात Black Water, काय आहेत या पाण्याचे फायदे वाचा सविस्तर

मलायका अरोरासह विराट कोहली पितात Black Water, काय आहेत या पाण्याचे फायदे वाचा सविस्तर

 साध्या पाण्यामध्ये आणि ब्लॅक वॉटरमध्ये नेमका काय फरक (Normal water vs Black Water) असतो? वाचा सविस्तर.

साध्या पाण्यामध्ये आणि ब्लॅक वॉटरमध्ये नेमका काय फरक (Normal water vs Black Water) असतो? वाचा सविस्तर.

साध्या पाण्यामध्ये आणि ब्लॅक वॉटरमध्ये नेमका काय फरक (Normal water vs Black Water) असतो? वाचा सविस्तर.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट:   पाणी आपल्या आयुष्यासाठी सर्वात गरजेचं असतं म्हणूनच आपण त्याला जीवन म्हणतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा 60 टक्के पाणी असतं. शरीरातील सर्व अवयव चांगल्या पद्धतीने कार्य करत रहावेत यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. कारण, आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचं काम पाणी करतं. यामुळेच पिण्याचं पाणी जास्तीत जास्त (Water Drinking benefits) स्वच्छ कसं असेल याकडे आपण लक्ष देतो. बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण तिथलं साधं पाणी न पिता केवळ मिनरल वॉटर मागवतो. सामान्य व्यक्ती जिथे पाण्याबाबत एवढी जागरुक असते, तिथं बॉलिवूड स्टार्स आणि खेळाडूंची तर गोष्टच वेगळी.

बॉलिवूड स्टार्स आणि खेळाडूंना आपल्या फिटनेसवर खूप लक्ष द्यावं लागतं. फिटनेस मेन्टेन ठेवण्यासाठी त्यांना खूप कष्टही घ्यावे लागतात. कारण त्यांची फिटनेस, स्टाईल हे कायम लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात. फिटनेससाठी काही सेलिब्रिटी पिलाटे आणि कीटो डाएटचाही (Keto diet) अवलंब करतात. खाण्याच्या सवयींव्यतिरिक्त एक अशी देखील गोष्ट आहे, जिचा वापर मलायका अरोरा (Malaika Arora), उर्वशी रौतेला, श्रुती हसन आणि विराट कोहली (Virat kohli) यांसारखे सेलिब्रिटी आवर्जून करतात, ते म्हणजे ‘ब्लॅक वॉटर’. फिट राहण्यासाठी हे सेलिब्रेटी ब्लॅक अल्कलाइन वॉटर (Alkaline Black water) पितात. पण साध्या पाण्यामध्ये आणि ब्लॅक वॉटरमध्ये नेमका काय फरक (Normal water vs Black Water) असतो? टीव्ही9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

एका अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे विशेष पाणी बनवण्यासाठी ब्लॅक मिनरल्सचा (Black minerals) वापर केला जातो. पाण्यात 70 टक्के खनिजं टाकली जातात, त्यामुळे पाण्याचा रंगही काळा होतो. यामुळेच हे पाणी साध्या पाण्यापेक्षा जास्त हेल्दी (Black water healthy) होतं. या पाण्याची किंमत चक्क 200 रुपये प्रति लिटर एवढी असते.

रक्षाबंधनआधी मिळवा इन्स्टंट ग्लो; घरच्या घरी लव्हेंडर, मधाचा फेस पॅक वापरून पाहा

पाणी पिण्याचे बरेचसे फायदे असतात. पाण्यामुळे शरीराचं तापमान देखील नियंत्रणात राहतं आणि संपूर्ण शरीरात मिनरल्स योग्य प्रमाणात पोहोचतात. हे तर साध्या पाण्याचे फायदे झाले. यापेक्षाही ब्लॅक वॉटर आरोग्यासाठी जास्त फायद्याचे (Benefits of Black Water) असते.

आरोग्यदायी अल्कलाइन ब्लॅक वॉटर

साध्या पाण्यात शरीराला आवश्यक असणारे सर्व मिनरल्स नसतात. साध्या आरओच्या पाण्यामध्ये पीएचची पातळी कमी असते (PH level in RO water) आणि ते ॲसिडिक आणि कडवट असते, असा दावा भारतात ब्लॅक वॉटर विकणाऱ्या एकमात्र कंपनीनं केला आहे. अल्कलाइन वॉटर साध्या पाण्यासारखेचं असते. मात्र, यात पोषणमुल्यांचे प्रमाण जास्त असते. उच्च रक्तदाब, डायबेटीस (मधुमेह) आणि हाय कोलेस्ट्रॉलची (Black Water benefits) समस्या असलेल्या लोकांसाठी हे पाणी फायदेशीर आहे.

पावसाळ्यात ‘हा’ मसाल्याचा पदार्थ रोजच्या जेवणात वापरा; Immunity होईल Strong

अल्कलाइन ब्लॅक वॉटरचे फायदे

अल्कलाइन पाण्याचे कण लहान असतात त्यामुळे ते सहजपणे शरीरात शोषले जाते. परिणामी साध्या पाण्याच्या तुलनेत ते जास्त हायड्रेटिंग (Black Water more hydrating) असतं. यामुळे स्नायू जास्त लवकर बळकट होतात आणि सांधे देखील ल्युब्रिकंट राहतात. याशिवाय किडनी देखील व्यवस्थित कार्य करते. यासोबतच अल्कलाइन वॉटर अॅसिडिटी कमी करून शरीरातील पीएच संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. या पाण्यामुळे शरीराच्या विविध अवयवांतून निर्माण होणारं अॅसिड नियंत्रणात राहतं. अल्कलाइन वॉटर पचनक्रिया (Black water for metabolism) चांगली करते. जेवणातील सर्व पोषणमुल्ये शरीरात व्यवस्थित शोषली जातात. परिणामी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार आपल्यापासून दूर राहतात. हे पाणी कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस एकदम अॅक्टिव्ह राहता. ब्लॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. हे पाणी फ्री रेडिकल्स कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे एजिंग प्रक्रिया (वय वाढण्याची क्रिया) संथ (Black water is anti-ageing) होते. याशिवाय तुमची त्वचा आणि केससुद्धा चांगले राहतात.

First published:

Tags: Drink water, Malaika arora, Virat kohli