नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : सुंदर दिणारी लॅव्हेंडरची फुलं (Lavender Flower) तितकीच औषधी (Medicine) असतात. याचा सुवार गोडसर असतो. त्यामुळे आल्हादायक असतो. लॅव्हेंडरचा वापर अनेक वस्तूंमध्ये केला जातो. लव्हेंडर ब्युटी प्रॉडक्टमध्ये (Beauty Product) देखील वापरलं जातं. लॅव्हेंडर आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) आहे. याशिवाय चेहऱ्यावरील पिंपल्स (Pimples) सारखे त्रासही कमी करतं. कॉस्मेटिक आणि आयुर्वेदिक (Cosmetics & Ayurveda) उपचारांमध्ये देखील लॅव्हेंडरचा वापर केला जातो. त्याच्या सुवासामुळे फ्रेश (Fesh) वाटतं.
लॅव्हेंडरचा अडीच हजार वर्षे जुना आहे. मिस्त्र, फोनिशियन आणि अरब लोक सुगंधित पदार्थ म्हणून लव्हेंडरचा वापर करत. तर, रोमन काळात लॅव्हेंडरला अतिशय किंमती वस्तू मानलं जायचं. प्राचीन रोमन काळात लॅव्हेंडरची फूलं 100 दिनार प्रती पौंड विकली जायची.
(अफगाणिस्तानात झाला सत्ता पालट पण, तालिबानमुळे भारतीयांच्या जेवणातली फोडणी महागली)
रोमन आंघोळीच्या पाण्यात सुगंधासाठी ही फुलं वापरत. तर प्राचीन ग्रीसमध्ये लॅव्हेंडर परफ्यूम म्हणून वापराचे. लॅव्हेंडर त्वचेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी तसंच स्किन केअर आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये प्राचीन काळापासून वापरलं जातं. त्वचेवरील जखमा, डाग दूर करण्यासाठी उत्तम आहे.
(गरज नाही टेरेसची! ऑगस्ट महिन्यात कोबी,गाजर,बीट लावा कुंडीत)
हल्ली लॅव्हेंडर पावडर, ऑईल, साबण, रेडी फेस पॅक म्हणूनही मिळतो. तर, आता लॅव्हेंडर पावडरही मिळते त्यामुळे तिचा वापर करण सहज शक्य आहे.
सध्या श्रावण महिना म्हणजे सणांचा काळ सुरू झालेला आहे. लवकरच रक्षाबंधन येईल त्यानंतर सणांची रेलचेल सुरू होईल. सणांच्या काळामध्ये चेहरा तजेलदार दिसावा असं वाटत असेल तर, लव्हेंडरचा फेसपॅक वापरू शकता. यासाठी लव्हेंडर आणि मधाचा वापर करावा.
लव्हेंडर फेस पॅक बनवण्याची कृती
लव्हेंडरच्या फुलांची पावडर 2 चमचे. हळद पाव चमचा, मध 1 चमचा आणि गुलाब पाणी 2 चमचे.
(रक्षा बंधनच्या दिवशी असणार राहू काळ; भावाला राखी बांधताना करू नका ‘या’ चुका)
एका भांड्यामध्ये लव्हेंडरच्या फुलांची पावडर हळद एकत्र करून घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यामध्ये मध मिसळून 5 मिनिटं तसंच ठेवा. चेहरा स्वच्छ धुऊन, कोरडा करून हा फेस मास्क चेहऱ्यावर लावा 20 ते 30 मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Face Mask, Home remedies, Lifestyle, Raksha bandhan, Skin care