नवी दिल्ली, 20 मे : अनेक लोकांना चक्कर येण्याचा त्रास होतो. बहुतेक लोकांना ही समस्या सकाळी उठल्यानंतर किंवा अचानक खाली बसून उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर जाणवते. चक्कर येण्याची समस्या सामान्य आहे. अनेक वेळा शरीरात रक्त कमी झाल्यामुळे चक्कर येते. परंतु, आपल्याला दररोज चक्कर येण्याची किंवा डोकं गरगरण्याचा त्रास होत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. डॉ. श्रेय श्रीवास्तव, वरिष्ठ निवासी-इंटर्नल मेडिसिन, शारदा हॉस्पिटल (नोएडा) यांनी चक्कर येण्याच्या मुख्य कारणांबद्दल माहिती (Causes of Dizziness) दिली आहे.
कमी रक्तदाब -
अचानक रक्तदाब कमी झाल्यास चक्कर येते. अचानक उठताना किंवा उभे राहिल्यास असा त्रास जास्त जाणवू शकतो. कारण, कधीकधी अचानक जास्त हालचाल झाल्यानंतर रक्तात काही रिअॅक्शन उशिराने जाणवतात. पोस्टरल हायपोटेन्शनच्या समस्येमुळे वृद्ध लोकांमध्ये देखील ही समस्या जाणवू शकते. यामुळे उभे राहिल्यानंतर तीन मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ चक्कर जाणवते.
ब्रेन ट्यूमर -
काही गंभीर प्रकरणांमध्ये चक्कर येणे हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण देखील असू शकते. तेथील गाठ मेंदूचे संतुलन नियंत्रित करणाऱ्या भागात वाढू लागते. यामुळे आपल्या शरीराला संतुलन राखण्यात अडचण येते.
ताण -
तणावामुळे मेंदूवर अतिरिक्त भार पडतो आणि त्याचा परिणाम प्रथम व्यक्तीवर मानसिकरित्या होतो, नंतर त्याचा परिणाम शारीरिकदृष्ट्याही दिसू लागतो. त्यामुळे जे लोक जास्त काळजी करतात किंवा सतत चिंताग्रस्त असतात त्यांना कधीही चक्कर येते.
हे वाचा -
Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला
चक्कर येणे टाळण्यासाठी उपाय -
जीवनशैलीत बदल करा. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन करू नका. रक्तदाब सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा. रक्तदाब वाढेल किंवा कमी होईल, असे पदार्थ खाणे टाळा. ताण घेणे कमी करा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. पुरेसे पाणी प्या. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा सरळ उभे राहू नका. तेजस्वी प्रकाश असलेल्या उपकरणांपासून दूर रहा. आपल्या शरीराची नियमित तपासणी करा. तसेच यामध्ये ब्लडप्रेशर चेकअप करणेही महत्त्वाचे आहे. सकस आहार घ्या, योग्य झोप घ्या. अनेक वेळा शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, चक्कर येण्याची समस्या उद्भवते, अशा स्थितीत लोहयुक्त पदार्थ खा.
हे वाचा -
जिथं याआधी कधीच घुसू शकला नाही त्या देशातही Monkyepox Virus चा शिरकाव; भारताला किती धोका?
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.