Home /News /lifestyle /

टेन्शन, अस्वस्थतेमुळं रात्री येत नाही नीट झोप? ही 7 कारणं आहेत त्याचं मूळ, जाणून घ्या उपाय

टेन्शन, अस्वस्थतेमुळं रात्री येत नाही नीट झोप? ही 7 कारणं आहेत त्याचं मूळ, जाणून घ्या उपाय

Causes of Nighttime Restlessness: आजकाल प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयींमध्ये खूप बदल झाला आहे. अनेकांना रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटू लागल्यानं नीट झोप लागत नाही. रात्रीच्या वेळी अधूनमधून कुस बदलत राहणं, मध्येच उठणे आणि परत झोपणे हे कॉमन होत चाललंय, पण...

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 05 मार्च : रात्रीची शांत झोप (Sleep) अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. योग्य झोप घेतल्याने (Sound sleep) आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहतो. दिवसातून 7-8 तास झोपल्याने मूड सुधारतो, उत्साही वाटते. दिवसभराचा आळस, थकवा निघून जातो. एकाग्रतेने कोणतेही काम करण्यास मदत होते. परंतु, आजकाल अनेक कारणांमुळे बहुतांश लोकांच्या झोपेवर परिणाम झालाय. यापैकी एक कारण म्हणजे अस्वस्थ (Restlessness) किंवा चिंताग्रस्त वाटणे. रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने लोक अंथरुणावर कुस बदलत राहतात. रात्री उशिरापर्यंत काम करणं आणि सकाळी लवकर उठणं यामुळे ऑफिस किंवा घरचे कोणतेही काम नीट होत नाही. अशा स्थितीत जर तुम्हाला झोपताना अस्वस्थता (Nighttime Restlessness) जाणवत असेल तर याची अनेक कारणे असू शकतात, जी वेळीच ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाय केले (Causes of Nighttime Restlessness) पाहिजेत. UPMC मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, आजकाल प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयींमध्ये खूप बदल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटू लागल्यानं नीट झोप लागत नाही. रात्रीच्या वेळी अधूनमधून कुस बदलत राहणं, मध्येच उठणे आणि परत झोपणे हे कॉमन असले तरी, दीर्घकाळच्या अस्वस्थतेचा तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे दिवसा झोप येणे, चिडचिड होणे, वजन वाढणे आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील कमी होते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो. संसर्गजन्य आजारांनाही यामुळे आपण लवकर बळी पडतो. रात्रीच्या वेळी अस्वस्थ वाटण्याची समस्या वाढवणारे अनेक घटक आहेत जसे की आहार, हार्मोन्स, तणाव इ. जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या दिसली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. रात्री अस्वस्थ वाटण्याची खालील काही कारणे असू शकतात- अस्वस्थ पाय सिंड्रोम रेस्टलेस लेग सिंड्रोम अनहेल्दी डाएट ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया हार्मोन्समध्ये चढ-उतार रात्री उशिरा व्यायाम करणं रात्री उशिरा जागून काम करणं कसला तरी तणाव असणं हे वाचा - ज्यांच्यात हे 5 गुण असतात, त्यांच्यावर भाळतात मुली; तुमच्याकडे आहे का हा गुण? रेस्टलेस लेग्स सिंड्रोम म्हणजे काय रेस्टलेस लेग्ज सिंड्रोममुळे (Restless Legs Syndrome) लोक झोपताना पाय हलवतात. यात पेटके येणे, मुंग्या येणे, जळजळ होणे, संवेदना जाणवतात. यामुळे रात्री झोपेचा भंग होतो आणि अंथरुणातून उठून थोडे चालल्यानंतर या समस्येपासून आराम मिळतो. रेस्टलेस लेग्स सिंड्रोमचे नेमके कारण माहित नाही, परंतु ते आनुवंशिकही असू शकते. महिलांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हा प्रकार सहसा 45 वर्षांच्या वयानंतर सुरू होतो. हे वाचा - पुरुषांची त्वचा असते रफ, त्याची विशेष काळजी घेण्यासाठी फॉलो करा या Tips अनहेल्दी डाइटमुळे अस्वस्थता येते जेव्हा तुमचा आहार योग्य, पौष्टिक, आरोग्यदायी नसतो, तेव्हाही रात्री चांगली झोप लागत नाही. अस्वस्थता, चिंता, तणाव यामुळे झोप मोडते. रात्री झोपण्यापूर्वी कॉम्प्लेक्स शुगर किंवा रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, कॅफीन, अल्कोहोल इत्यादींचे सेवन केल्यानेही गाढ झोप लागत नाही आणि तुमची झोप रात्री पुन्हा पुन्हा तुटत राहते. हे सर्व पदार्थ शरीराच्या सर्कॅडियन लयमध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या