जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Burning Tips: हात भाजल्यावर अनेकजण या चुका करतात; जखम त्यामुळं लवकर बरी नाही होत

Burning Tips: हात भाजल्यावर अनेकजण या चुका करतात; जखम त्यामुळं लवकर बरी नाही होत

Burning Tips: हात भाजल्यावर अनेकजण या चुका करतात; जखम त्यामुळं लवकर बरी नाही होत

हात भाजल्यास अनेकजण काही कॉमन चुका (What not to do after burning) करतात. त्यामुळे भगभग कमी होण्याऐवजी त्याचा त्रास जास्त वाढत जातो. नेमकं काय करावं जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 एप्रिल : स्वयंपाक हा काही लोकांचा छंद असतो, तर काहींना सक्तीनं करावा लागतो. स्वयंपाकघरात काम करण्याचे कारण काहीही असो, पण चाकूनं हात कापला जाणं, हात भाजण्यासारख्या दैनंदिन जीवनातील लहान-सहान घटना प्रत्येकासोबत घडतात. त्वचेवर कापल्यास आपण अ‌ॅसेप्टिक औषधांची मदत घेऊ शकतो, परंतु स्वयंपाकघरात काम करताना हात भाजल्यास अनेकजण काही कॉमन चुका (What not to do after burning) करतात. त्यामुळे भगभग कमी होण्याऐवजी त्याचा त्रास जास्त वाढत जातो. भाजल्यास लगेच आराम मिळवण्यासाठी आपण बर्फापासून ते टूथपेस्टपर्यंत अनेक गोष्टी करून पाहतो. पण, तुम्हाला या गोष्टींचे दुष्परिणाम माहीत आहेत का? नसेल तर ही बातमी तुमच्या (Burning Tips) कामाची आहे. बर्फ घासणे - जळजळ शांत करण्यासाठी भाजल्यानंतर लगेच त्वचेवर बर्फ लावतात. ही पद्धत बहुतेक लोक फॉलो करतात. अर्थात त्यामुळे सुरुवातीची जळजळ, वेदना कमी होतात. पण, भाजल्यानंतर लगेच बर्फ लावल्याने हीट आणि कोल्ड इंजरी मिक्स होते. ज्यामुळे थर्म इंजरीचा त्रास होऊ शकतो. टूथपेस्ट लावणे - भाजल्यानंतर वेदना कमी करण्यासाठी अनेकजण टूथपेस्ट लावतात. टूथपेस्टचा प्रभाव थंड असल्याचे मानले जाते. ज्यामुळे होणारी भगभग कमी होते. मात्र, हा उपायसुद्धा करणं चुकीचं आहे. टूथपेस्टमुळे त्वचेची छोटी छिद्रे भरून जातात त्यामुळे जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदावते. जळजळदेखील बराच काळ कमी होत नाही. हे वाचा -  लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय फोड फोडणे - जास्त भाजल्यानंतर त्वचेवर फोड येतात. कित्येकजण त्वचेवर आलेले फोड लगेच फोडतात आणि त्यातील पाणी काढण्याचा प्रयत्न करतात. असं करणं चुकीचं आहे, यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो आणि त्रास कमी होण्याऐवजी जास्त दिवस राहतो. म्हणून, फोड फोडण्याऐवजी त्यावर ड्रेसिंग करणं चांगलं. हे वाचा -  ‘या’ कुकिंग ऑइल्समुळे असते कॅन्सर होण्याची शक्यता; वेळीच व्हा सावध उन्हात नको - भाजल्यानंतर सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क सर्वात धोकादायक आहे. सूर्याची हानिकारक किरणे जखमेवर पडल्यानं भगभग जास्तच वाढते. त्यामुळे त्वचेवर फोड येण्याची भीतीही असते. त्यामुळे उन्हात बाहेर पडल्यास भाजलेला भाग झाकायला विसरू नका. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात