Home /News /lifestyle /

या सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर मृत्यू होण्याची शक्यता जास्त - संशोधन

या सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर मृत्यू होण्याची शक्यता जास्त - संशोधन

अमेरिकेत नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, तीव्र तणावामुळे (Acute Stress) शरीराची कोरोना आणि इन्फ्लूएंझा सारख्या संसर्गाशी लढण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते. यामुळे मृत्यूचा धोकाही वाढतो.

    नवी दिल्ली, 02 जून : अलिकडच्या धावपळीच्या जीवनशैलीत चिंता आणि तणाव (Stress) हा जीवनाचा एक भाग बनला आहे. क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्याला कसलाही ताण-तणाव नाही. ताण-तणाव आपल्याला फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही हळूहळू आजारी बनवू शकतो. तणावावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर नैराश्य येऊ शकतं. इतकंच नाही तर अनेक गंभीर आजार आपल्या मागे लागू शकतात. अमेरिकेतील मिंट सिनाई इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, तीव्र तणावामुळे (Acute Stress) शरीराची कोरोना आणि इन्फ्लूएंझा सारख्या संसर्गाशी लढण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते. यामुळे मृत्यूचा धोकाही वाढतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे. प्रथमच, उंदरांवरील या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, तीव्र तणाव आणि कोरोना किंवा इन्फ्लूएंझाच्या संसर्गाच्या वेळी मेंदूचे काही भाग शरीराच्या सेल्युलर प्रतिकारशक्तीवर (cellular immune response) कसे नियंत्रण ठेवतात. या अभ्यासाचे निष्कर्ष 'नेचर' जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अभ्यासात काय झाले - संशोधकांना त्यांच्या अभ्यासात आढळून आले की, तीव्र ताण मेंदूच्या एका विशिष्ट भागात न्यूरॉन्सला उत्तेजित करतो. यामुळे पांढऱ्या रक्तपेशी किंवा ल्युकोसाइट्स लहान ग्रंथी (लिम्फ नोड्स) मधून बाहेर पडतात आणि रक्त आणि अस्थिमज्जामध्ये प्रवेश करतात. ही प्रक्रिया कोरोना किंवा इन्फ्लूएन्झा सारख्या आजारांशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करते. यामुळे, संसर्गापासून गंभीर आजार होण्याचा धोका आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. हे वाचा - मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहा तज्ज्ञ काय म्हणतात? माउंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे (Icahn School of Medicine) मेडिसिन आणि कार्डियोलॉजीचे प्रोफेसर, फ़िलिप के. स्विर्स्की (Filip K. Swirski) यांच्या मते, 'हा अभ्यास सांगतो की, तणावाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि संसर्गाशी लढण्याच्या क्षमतेवर खूप मोठा प्रभाव पडतो.' हे वाचा -  आवळ्याचा रिकाम्या पोटी करा असा उपयोग; वजनात लगेच दिसेल फरक हा अभ्यास आपल्या सामाजिक-आर्थिक घटक, जीवनशैली आणि पर्यावरणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करतो. आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हा मोठा प्रश्न आहे, जेणेकरून संसर्गाविरूद्ध आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होणार नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Mental health, Stress

    पुढील बातम्या