जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अचानक हात-पाय दुखणे, सूज येणं म्हणजे Water retention असू शकतं; इतरही आहेत अनेक कारणं

अचानक हात-पाय दुखणे, सूज येणं म्हणजे Water retention असू शकतं; इतरही आहेत अनेक कारणं

अचानक हात-पाय दुखणे, सूज येणं म्हणजे Water retention असू शकतं; इतरही आहेत अनेक कारणं

बहुतेक वेळा ही समस्या पाय, टाच किंवा चेहऱ्यावर दिसून येते. शरीराच्या ऊतींमध्ये द्रव तयार झाल्यामुळे हे घडतं. दिवसा जास्त वेळ बसून राहिल्यामुळे किंवा बराच वेळ विमानप्रवास केल्यामुळेही असं होऊ शकतं. याशिवाय असणाऱ्या इतर कारणांची सविस्तर माहिती घेऊ.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जुलै : अचानक हात-पाय दुखणे, सूज येणे किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागली तर लक्षात घ्या की, हे त्या भागांमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे (Water Retention) होत आहे. हे संप्रेरकांच्या असंतुलनामुळे (Hormonal Imbalance) किंवा इतर कोणत्याही शारीरिक स्थितीमुळे होऊ शकतं. जीवनशैलीत काही बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. परंतु, त्याआधी त्यामागील कारण शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बहुतेक वेळा ही समस्या पाय, टाच किंवा चेहऱ्यावर दिसून येते. शरीराच्या ऊतींमध्ये द्रव तयार झाल्यामुळे हे घडतं. दिवसा जास्त वेळ बसून राहिल्यामुळे किंवा बराच वेळ विमानप्रवास केल्यामुळे होणं सामान्य आहे. ही समस्या वाढवणारी आणखी कोणती कारणं आहेत, ते जाणून घेऊ. हार्मोन रेग्युलेशन एनसीबीआयच्या संशोधनानुसार, काही हार्मोन्स शरीरातील द्रव नियंत्रित करतात. या संप्रेरकांच्या पातळीतील चढउतारांमुळे किंवा असंतुलनामुळे वॉटर रिटेन्शनची समस्या होऊ शकते. जास्त प्रमाणात मिठाचं सेवन जास्त प्रमाणात मीठ खाणं किंवा मीठ जास्त प्रमाणात असलेले पदार्थ (उदा., लोणचं) खाणं हे देखील वॉटर रिटेन्शनचं एक कारण असू शकतं. याशिवाय, जर तुम्ही जास्त प्रक्रिया केलेलं अन्न खात असाल तर, याच्यामुळं शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढू लागतं. यामुळे वरील समस्या उद्भवते. काही औषधोपचारांमुळे काही औषधांचे सेवन हे देखील शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साठून राहण्याचं कारण असू शकतं. जसं की, किमोथेरपी, ओव्हर द काउंटर आणि रक्तदाबावरील औषधं, पार्किन्सन आजारावरील औषधं आणि गर्भनिरोधक गोळ्या (Hormonal Birth Control Pills) हे देखील कारण असू शकतं. बराच वेळ उभं राहणं किंवा बसणं जर तुम्ही एखादं असं काम करत असाल ज्यासाठी बराच वेळ बसणं किंवा उभं राहणं आवश्यक आहे, तर यामुळं शरीराच्या काही भागात पाणी साठू लागतं, फार वेळ उभं राहून किंवा बसून काम करताना अधे-मधे थोडा वेळ चालण्याचा किंवा काही छोट्या व्यायामप्रकारांनी शरीराच्या हालचाली करण्याचा प्रयत्न करा. हे वाचा -  Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम हृदयाची संबंधित समस्या जेव्हा हृदय काम करण्याचं थांबवू लागतं किंवा हार्ट फेल्युअरसारखी समस्या उद्भवते, तेव्हा शरीरातील काही अवयवांवर पाणी धरून ठेवण्याची समस्याही दिसून येते. या भागांमध्ये सूज दिसून येते. गर्भधारणेदरम्यान गरोदरपणात वाढत्या वजनामुळे अनेकांचे पाय सुजायलाही लागतात आणि याचंही वॉटर रिटेन्शन हेच कारण आहे. हे वाचा -  पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार मासिक पाळी अनेक वेळा मासिक पाळीच्या काळात हार्मोन्समध्ये असंतुलन होते, तेव्हा ही समस्या होणं सामान्य आहे. तसंच, काही लोकांना जहाजात प्रवास केल्यामुळेही वॉटर रिटेन्शनचा त्रास होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात