Home /News /lifestyle /

आई व्हायचंय! प्रेग्नन्सीसाठी फायद्याची ठरू शकते ही पावडर

आई व्हायचंय! प्रेग्नन्सीसाठी फायद्याची ठरू शकते ही पावडर

प्रजननक्षमता वाढवून ही पावडर प्रेग्नन्सीचे (Pregnancy) चान्सेस वाढवते.

    मुंबई, 11 सप्टेंबर : अयोग्य जीवनशैलीचा फर्टिलिटी म्हणजे प्रजननक्षमतेवरही परिणाम (Fertility) होता. त्यामुळे महिलांना प्रेग्नेन्सीत (Pregnancy) अनेक अडचणींचा सामना करावा करावा लागतो. अनेकदा महिलांना गर्भधारणा हवी असते परंतु त्या गर्भवती होत नाही. त्यासाठी बरेच उपचार केले जातात. तुमची प्रजननक्षमता चांगली करणारं आणि प्रेग्नन्सीसाठी फायद्याचं ठरणारं एक वनऔषधी शतावरी. ज्याला शतावर, शतमूऴ किंवा शतमूळी नावानेही ओळखलं जाते. प्रेग्नन्सीमध्ये मासिक पाळीचीही भूमिका महत्त्वाची असते. मासिक पाळीत अनियमितता असल्यास प्रेग्न्सीमध्ये समस्या येऊ शकतात. पण शतावरीच्या सेवनामुळे मासिक पाळीत (Menstrual cycle) असणारी अनियमितता दूर होते. फक्त प्रजननक्षमता वाढवण्यात नाही तर प्रेग्नन्सीतही शतावरीचा फायदा होतो. शतावरीत मोठ्या प्रमाणात फोलेट असतं. त्यामुळे गर्भवती महिलांच्या पोटातील बाळाला हाडांसंबंधी विकार कमी होतात. हे वाचा -  High Blood Pressure चा त्रास आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश शतावरीचे सेवन हे कॅप्सूल, लिक्विड किंवा पावडरच्या रूपातही घेता येते. परंतु त्याचा वापर करताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर गर्भधारणेच्या काळात नेमकं काय करावं आणि काय नाही, याचं योग्य पद्धतीने डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. शतावरीचे महिलांना इतरही फायदे शतावरीच्या नियमित सेवनामुळे त्वचा उजळते. चेहऱ्यावरील डागही कमी होतात. हे वाचा -  नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काय कराल? मायग्रेनच्या त्रासातून सुटका होऊ शकते. तणाव आणि अनिद्रेतूनही मुक्तता होऊ शकते. मानसिक आजारांपासूनही सुटका होते. Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy, Sexual health

    पुढील बातम्या