Home /News /heatlh /

High Blood Pressure चा त्रास आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

High Blood Pressure चा त्रास आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) मागील तीन दशकांपासून रक्तदाबाच्या (High blood pressure) केसेस वाढल्या आहेत. हा आजार जेव्हा वाढतो तेव्हा अनेक लोक याचा योग्य उपचार करणं टाळतात. त्यामुळे याचा त्रास आणखी वाढत जातो.

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालानुसार जगभरातील 1. 13 कोटी लोक हे हायपर टेंशन म्हणजे उच्च रक्तदाबाच्या (High blood pressure or hypertension) त्रासाने ग्रस्त आहेत. लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) मागील तीन दशकांपासून रक्तदाबाच्या (High blood pressure) केसेस वाढल्या आहेत. हा आजार जेव्हा वाढतो तेव्हा अनेक लोक याचा योग्य उपचार करणं टाळतात. त्यामुळे याचा त्रास आणखी वाढत जातो. उच्च रक्तदाबामुळे भारतातही अनेक लोकांना अनारोग्याचा (Unstable Health) सामना करावा लागत आहे. भारतात याचे प्रमाण हे 30 टक्क्यांच्या घरात आहे. हायपर टेंशनच्या या आजाराला साइलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. कारण हा हळूहळू व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतो आणि नंतर अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचीही संभावना असते. त्यामुळे आता हा आजार तुम्हाला असेल तर याचा कसा सामना कराल किंवा आपल्या आहारात काय बदल कराल याची माहिती आपण घेऊयात. हायपर टेंशनमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर याचा नकारात्मक प्रभाव होतो. आपल्या शरिरातील सर्व भागात रक्तपुरवठा न झाल्यामुळे व्यक्तीचे आरोग्य ढासळण्याची भीती असते. त्याचबरोबर याचा विपरित परिणाम हा आपल्या ह्रदयावरही (Heart) होतो. असंतूलित आहार, लठ्ठपणा, शरीरातील चरबीचे वाढणारे प्रमाण, डायबिटीज किंवा किडनीचे आजार हे शरिरातील उच्च रक्तदाबामुळे होतात. त्यासाठी व्यक्तीचा असंतूलित आहार असणे हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश असणे आवश्यक असते. त्याचबरोबर कमी फॅट असणारे आणि पोषकतत्वांनी भरपूर अशा अन्नपदार्थांचा वापर आपल्या आहारात करायला हवा. गर्भवती महिलांना का पडतात टेन्शन वाढवणारी स्वप्नं? हल्लीच्या धावपळीच्या जगात अनेकांचे आहार संतूलित नाही. त्यामुळे जास्तीत जास्त दररोजच्या आहारात संत्री, मोसंबी किंवा लिंबूचा समावेश करावा. त्याचबरोबर पालक आणि कोबीचेही योग्य प्रमाणात सेवन करा. त्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते. त्यासाठी डाळी खाणे हा ही एक सर्वोत्तम उपाय आहे, त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोनदा तरी डाळींचा समावेश आहारात असायला हवा.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Blood bank, Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या