दिल्ली, 10 सप्टेंबर : व्यक्तीला नैराश्य (Depression) आले की तो आत्महत्येस प्रवृत्त होतो. त्यावेळी त्याला नैराश्यातून बाहेर काढणे फार गरजेचे असते. अशा वेळी नैराश्यग्रस्त लोकांना वाचवता यावं यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबरला (World Suicide Prevention Day) साजरा केला जातो. याचे उद्देश्य हे आत्महत्येचे (Suicide) प्रमाण कमी करणे आणि नैराश्याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे होते. या उपक्रमाची सुरूवात ही 2003 साली इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिवेंशन (IASP) आणि जागतिक आरोग्य संगठनेने (WHO) मिळून केली होती. याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या हेतूने आयएएसपी (IASP) 60 पेक्षा अधिक देशांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करतो.
आजच्या धावपळीच्या जगात अनेकदा व्यक्तीला यश किंवा अपयश येते. त्यामुळे जेव्हा लोक अपयशी होतात, तेव्हा ते आत्महत्येविषयी विचार करायला सुरूवात करतात. त्यावेळी त्यांना त्याच्या आवडत्या व्यक्तीजवळ त्याच्या भावना व्यक्त करू देण्याची गरज असते. त्यामुळे काही क्षणातच तो नैराश्यग्रस्त व्यक्ती हा सकारात्मक विचार करायला लागतो.
आत्महत्येचा विचार कसा घालवाल?
लक्षात ठेवा समस्या या चिरकाल असतात, आयुष्य हे एकदाच मिळते. त्यामुळे अशा कठीण समयी समस्यांवर उपाय शोधणे हा सर्वोत्तम उपाय असतो. त्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार घालवण्यासाठी व्यक्त होणे हे फार गरजेचे आहे.
शरीरातील उष्णतेने त्रस्त आहात; तर 'या' आहेत काही ज्यांची घ्या काळजी
या घातक गोष्टींपासून दूर रहा
जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या रूममध्ये धारदार शस्त्र असतील तर आधी ते तुमच्यापासून दूर ठेवा. कारण व्यक्ती हा रागाच्या भरात काहीही करण्याची शक्यता असते. त्यामुळे ही काळजी आधीच घेतलेली बरी.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर तुम्हाला सातत्याने नैराश्य येत असेल तर त्यासाठी दुसरा महत्वाचा उपाय हा डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणं हा आहे. त्यामुळे जर तुम्हाला सातत्याने नैराश्य येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ड्रग्ज आणि दारूपासून दूर रहा
आयूष्यातील कठिण समयी नैराश्यग्रस्त व्यक्तीला योग्य व्यक्तीची गरज असते. त्याचवेळी जर त्या व्यक्तीच्या हातात दारू किंवा ड्रग्ज असेल तर त्याला नैरास्शातून बाहेर काढणे कठीण होऊन जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Depression, Health Tips, Who, World news