मुंबई, 29 जून : आपण सर्वांनी अनेक ड्रायफ्रुट्स आणि हेल्दी पदार्थांविषयी ऐकले असेल त्याचा आपल्या शरीराला वेगवेगळ्या रोगांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात फायदा होतो. आज आपण सूर्यफुलांच्या बियाबद्दल जाणून घेणार आहोत. सूर्यफुलाच्या बिया लठ्ठपणा कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एकूणच सूर्यफुलाच्या बिया आपल्याला पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. अनेक वेळा आपल्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते, त्यावेळीही सूर्यफुलाच्या बिया खूप मदत (Sunflower Seeds Benefits) करतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असे काही घटक आढळतात जे आपल्या शरीराला डिटॉक्स करतात. सूर्यफुलाच्या बिया आपल्या शरीरातील चयापचय वाढवतात. सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
सूर्यफूल बिया -
हेल्थलाइननुसार सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात. ते आपल्या शरीराशी संबंधित विविध रोग आणि विविध समस्यांमध्ये फायदेशीर आहेत. हार्मोनल असंतुलन असो किंवा लठ्ठपणा असो किंवा रक्तदाबाचा त्रास असो सूर्यफुलाच्या बिया सगळ्यावर फायदेशीर ठरतात. त्याचे औषधी गुणधर्म आपल्या शरीराला शक्ती आणि उत्तम आरोग्य प्रदान करतात.
सूर्यफुलाचे फायदे
लठ्ठपणा -
सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते आणि परिणामी चयापचय वाढते, शरीरासाठी ते फायदेशीर असते. सूर्यफूलाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, त्याचा हृदयासाठी नाही तर आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासही फायदा होतो. या दोन्हीचा परिणाम म्हणजे आपले वजन कमी होते आणि लठ्ठपणाच्या समस्यांपासून आपण वाचतो.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर -
सूर्यफूल आपल्या शरीराच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले एन्झाईम्स आपल्या शरीरातील पाचक रसांचे स्राव नियंत्रित करतात आणि शरीरातील अनावश्यक आणि विषारी पदार्थ काढून टाकतात.
हाडांसाठी फायदेशीर -
सूर्यफूल आपल्या हाडांसाठीही खूप फायदेशीर आहे. सूर्यफुलामध्ये लोह, जस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. परिणामी आपली हाडे निरोगी राहतात.
मधुमेहासाठी फायदेशीर -
सूर्यफुलाचा वापर मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुबलक प्रमाणात केला जातो. सूर्यफुलाच्या बियांचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होतो. कमी कार्बोहायड्रेट घटकासह पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटही त्यात जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
हार्मोनल असंतुलनासाठी फायदेशीर -
सूर्यफुलाच्या बियांमध्ये 100 प्रकारचे एंजाइम आढळतात. आणि हे एन्झाईम्स आपल्या शरीरातील हार्मोनल संतुलन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. सूर्यफूल विशेषतः स्त्रियांच्या हार्मोनल ऑर्डरसाठी फायदेशीर आहे. वाळलेल्या सूर्यफुलाच्या बिया स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन संतुलित करण्यास मदत करतात आणि प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम, थायरॉईडला प्रतिबंध करतात.
हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
कोलेस्ट्रॉल -
खराब कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी आपल्यासाठी घातक असते. सूर्यफुलाच्या बिया आपल्या वाढलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करू शकतात. त्यामुळे कमी भूक लागेल, तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटेल आणि निरोगी राहाल. एकूणच सूर्यफुलाच्या बिया वेगवेगळ्या रोगांवर फायदेशीर ठरतात. इतर ड्रायफ्रुट्स बरोबर सूर्यफुलाच्या बिया आपण नियमित खायला हव्यात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Sunflower