मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Yoga Guide राग, चिडचिडेपणा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणारी आसनं

Yoga Guide राग, चिडचिडेपणा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणारी आसनं

फुप्फुसांची ताकद वाढवणारी 5 योगासने

फुप्फुसांची ताकद वाढवणारी 5 योगासने

तुम्हाला हेल्दी (Healthy) आणि दिर्घ आयुष्य (Life) जगायचं असेल तर, दररोज योगासन (Yoga) करावीत. काही योगासनांनी आपले आजारही कमी होतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,31 मे : रोग प्रतिकार शक्ती (Immunity) वाढविण्यासाठी नियमितपणे योगासनं केल्यास शरिराला एनर्जी मिळते आणि अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. सध्याच्या काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी (Strong Immunity) नियमितपणे योगा करावा. योगासनांमुळं शरिराला अनेक फायदे होतात. योगामुळे एनर्जी वाढते, (Yoga) शरिराच्या व्याधी कमी होतात(Reduced Disorders of the body) तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहतं. योगासनांमुळं ब्लड सर्क्युलेशन (Blood Circulation) सुधारतं, पचनक्रिया सुधारते (Improves Digestion). सध्याच्या जीवनशैलीनं राग आणि चिडचिडेपणा वाढतो आहे. हा मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासनं महत्वाची भूमिका बजावतात.

वीरभद्रासन

वीरभद्रासन कुणालाही सहजपणे जमणारं आसन आहे. गर्भवती महिला देखील हे करू शकतात. हे करण्यासाठी पाय समांतर रेषेत ठेवा दोन्ही बाजूंनी हात सरळ करा. उजवा पंजा वळवत उजव्या बाजूला वळा. यावेळी दोन्ही हात स्थिर ठेवा. हे आसन करताना आपला मणका ताणला जातो. पायांचे स्नायू मजबूत होतात. श्वसन क्रियेसाठी फायदेशीर ठरते.

(आता हेच बाकी होतं! अशी Wet Pants Denim घालण्याची तुमची तयारी आहे का?)

मत्स्येन्द्रासन

हे आसन मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, मुत्राशय आणि पोटासाठी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, या आसनानं ओटीपोटावरची चरबी कमी होते. मत्स्येंद्रासन सर्व अवयवांशी संबंधित रोग बरे करण्यास मदत करतं. मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, शरिरावर वाढलेली चरबीवर फायदेशीर ठरतं. हार्नियाचा त्रास असलेल्यांनी हे आसन टाळावं.

(Mrs. Grand Universe India 2021 - डॉ. शशिलेखा नायर यांचा उत्तुंग भरारीचा प्रवास)

भू नमन आसन

भू-नमन आसन हा एक वज्रासनाचा प्रकार आहे. यामध्ये आपलं शरीर समोर वाकवून आपलं नाक जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आसन नियमित केल्यास मधुमेह, सर्दी, वातविकार, स्वप्नदोष, निद्रानाश, दमा यांसारख्या आजारांपासून दूर राहता येतं.  हे आसन मणक्यांसाठी खूप चांगलं आहे. पण, यात श्वास बाहेर टाकत पुढे वाकत जमिनीवर डोकं टेकवावं लागत त्यामुळे एखाद्याचं शरीर लवचिक नसेल त्याने योगा बेल्टचा वापर करावा. हार्मोनल बॅलन्स बिघडल्याने पाळीचा त्रास होत असेल तर, तोही या योगासनाने कमी होतो.

(खाणंपिणं व्यवस्थित असतानाही Constipationचा त्रास; मग या समस्येला हलक्यात घेऊ नका)

विपरीत करणी आसन

कोणीही सहजपणे हे आसन करू शकतं. हे करण्यासाठी आधी सरळ झोपा दोन्ही हात मागे कमरेवर ठेवा. पाय वर उचला. हात कमरेवर ठेवून सरळ रेषेत उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपली रक्त शुद्धीकरणाची क्रिया होते. स्त्रियांच्या पायात सूज येणं, पायात मुंग्या येणं, पाय थरथरणे असे त्रास असतील तर, याने पूर्णपणे बरे होतात. मन आणि मेंदू शांत ठेवतो. नैराश्य कमी होतं. पण हाय बीपी आणि हार्ट प्रॉब्लेम असणाऱ्यांनी हे आसन टाळावं.

First published:

Tags: Lifestyle, Yoga