जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आता हेच बाकी होतं! अशी Wet Pants Denim घालण्याची तुमची तयारी आहे का?

आता हेच बाकी होतं! अशी Wet Pants Denim घालण्याची तुमची तयारी आहे का?

आता हेच बाकी होतं! अशी Wet Pants Denim घालण्याची तुमची तयारी आहे का?

विचित्र फॅशनच्या दुनियेत Wet Pants Denim आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 29 मे : फॅशनमध्ये (Fashion) कधी, काय विचित्र येईल याचा नेम नाही. मग तो एखादा ड्रेस असो, टॉप असो, ज्वेलरी असो, हँडबॅग असो किंवा जीन्स. फॅशनच्या (Fashion trend)  विचित्र जगात जीन्समध्ये (Jeans) तर तुम्ही कितीतरी प्रकार असतील. सध्या अशाच एका नव्या जीन्सची चर्चा होते आहे. ही जिन्स सोशल मीडियावरही चांगलीच ट्रेंड होते आहे. या जीन्सचे (Wet jeans) फोटो सोशल मीडियावर व्हाल झाले आहेत. फॅशनच्या दुनियेत आता ‘वेट पॅन्ट्स डेनिम’ (Wet Pants Denim) आली आहे. नावाप्रमाणेच ही जीन्स ओली असल्यासारखी दिसते. या जिन्सच्या विशिष्ट भागावार असा रंग देण्यात आला आहे, ज्यामुळे ती पाहणाऱ्या भिजलेली असल्यासारखीच वाटते. विशेष म्हणजे हा ओला भाग नको त्या ठिकाणी आहे. म्हणजे जिन्सच्या चेनच्या समोर, मागच्या बाजूला ही जिन्स ओली दिसते. म्हणजे ही जीन्स वापरणाऱ्या व्यक्तीने जीन्समध्येच लघवीच केली आहे, असं पाहणाऱ्याला वाटेल.

    जाहिरात

    वेट पॅन्ट्स डेनिमच्या सीईओने नाव न जाहीर करण्याच्या बोलीवर मेल मॅगझिन शी (Mel Magazine) बोलताना सांगितलं की, जीन्स ओली दिसावी यासाठी बरेच जण पँटमध्ये लघवी करतात. मात्र, हा ओलावा फक्त काही वेळेपुरताच असतो. त्यामुळे यावर पर्याय म्हणून ग्राहकांसाठी आम्ही अशी पँट तयार केली आहे. या पँट जोपर्यंत टिकतील, तोपर्यंत त्या ओल्या असल्यासारख्या दिसतील. हे वाचा -  भयंकर! सौंदर्याच्या नादात जीवाशी खेळ; नाजूक पायांसाठी नस कापून घेतायेत तरुणी कंपनीच्या सीईओच्या मते, जाहिरात प्लॅटफॉर्म (advertising platform ) म्हणून इन्स्टाग्रामने (Instagram) ब्रँडला विशिष्ट लोकसंख्येला टार्गेट करण्यास मदत केली आहे. “मी तरुणांमधील फॅशन, ऑनलाइन शॉपिंग आणि इतर इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी अनेक मोठ्या शहरांमध्ये जात आहे. ब्रँडिंगच्या दृष्टीकोनातून एक चांगला प्रयोग असून लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी चांगला पर्याय कोणता, याबाबत आम्ही नेहमी नवीन माहिती घेत असतो, असेंही ते मेल मॅगझिनला म्हणाले. हे वाचा -  Kiss करताना का बंद होतात डोळे? तज्ज्ञांनी उलगडलं ‘लिपलॉक’ मागील रहस्य दरम्यान, ही जिन्स पाहिल्यानंतर नेटिझन्स (Netizens ) गोंधळले आहेत. तर रेडिटवरील काही लोकांनी ही जीन्स वापरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक ट्विटर युझर्सनी म्हटलंय की ते असे प्रॉडक्ट्स गांभीर्याने घेत नाहीत. ही जीन्स बघून सध्या नेटकरी गोंधळले असले तरी बरेच लोक अशा जीन्स वापरतात. त्यामुळे त्या लोकांचा तर जीन्स ओली करण्याचा खूप मोठा प्रश्न या कंपनीने सोडवला आहे. तर, विचार काय करताय, तुम्हाला पण काहीतरी हटके स्टायलिंग करायची असेल तर ही जीन्स एकदा ट्राय करून बघा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात