मराठी बातम्या /बातम्या /Viral /एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची, वाचा सविस्तर

एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची, वाचा सविस्तर

आदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची. वाचा संपूर्ण कथा.

आदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची. वाचा संपूर्ण कथा.

आदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची. वाचा संपूर्ण कथा.

दक्षिण आफ्रिका, 14 जून: जगभरात असंख्य देश आहेत. प्रत्येक देशाची काही वैशिष्ट्ये असतात. रितीरिवाज असतात. दक्षिण आफ्रिका (South Africa) या आदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची. या राणीकडे (Queen) पाऊस (Rain) आणण्याची शक्ती असते आणि ती कधीही पाऊस आणू शकते असं मानलं जातं. इथल्या लिंपोपो प्रांतातील आदिवासी जमातीत ही प्रथा आहे. मसलानाबो मोदजादजी (Masalanbo Modjadji) ही राजकुमारी सध्या वयानं लहान असल्यानं ती 2023 मध्ये या प्रांताची सातवी राणी होईल. त्यामुळं सध्या हा प्रांत चालवण्याची जबाबदारी तिच्या भावाला देण्यात आली आहे. मात्र भावाची सत्ता तात्पुरती असून, राजकुमारीचे योग्य वय होण्याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.

आधी पुरुषांचेच राज्य होते

या प्रांताच्या राण्यांच्या राजवटीमागं एक कथा आहे. इथले आदिवासी लोक 400 वर्षांपूर्वी झिम्बाब्वेहून (Zimbabwe) आले होते. तेव्हा पुरुषच राज्य करत होते. त्यांच्या आपापसांत लढाई होत. यात बरेच लोक मरण पावले. तेव्हा शेवटच्या पुरुष राजाच्या स्वप्नात आलेल्या एका दैवी शक्तीनं त्याला सर्व सत्ता स्त्रियांच्या स्वाधीन करण्यास सांगितलं. यानंतर, राजाच्या मोठ्या मुलीनं राज्याची सूत्रं हाती घेतली.

पहिल्या राणीच्या कारकिर्दीत चांगला पाऊस

या पहिल्या महिला राणीला मोदजादजी म्हणजे राज्य करणारी असं म्हटलं गेलं. ही राणी सत्तेवर येताच प्रांतातील परिस्थिती सुधारू लागली आणि लढाई संपली. या राणीला पर्जन्य देवतेचा आशीर्वाद आहे, असा विश्वास होता. त्यामुळं इतर प्रांतातील राजेही पाऊस पाडावा अशी विनंती तिच्याकडे करत.

अवघड होतं तिचं आयुष्य

या राणीला स्वत: ला इतर स्त्रियांपेक्षा आपण वेगळं असल्याचं सिद्ध करावं लागलं. यासाठी तिला विविध प्रकारच्या तंत्र-मंत्रांचा जप करावा लागला. तिनं जंगलात बराच काळ एकटीने घालवला, तिथूनच ती आपल्या पुरुष साथीदारांना राज्य चालवण्याबाबतचे आदेश देत असे. तिनं लग्नही केलं नाही, आपल्याच कुटुंबातील पुरुषांशी संबंध ठेवून मुलांना जन्म दिला. हे लोक राणीचा नवरा किंवा साथीदार नव्हते, परंतु ते फक्त मुलांना जन्म देण्याचे साधन होते आणि घरातील कामकाज सोडून त्यांना कुठेही बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. स्त्रियांच्या बाबतीत जसं घडत आलं होतं. तसंच इथं पुरुषांबाबत घडत होतं. पहिल्या राणीनं 1800 ते 1854 पर्यंत राज्य केलं. तिच्या मृत्यूनंतर थोरल्या मुलीला राज्य मिळालं आणि ही परंपरा कायम राहिली.

अधिकार काढून घेण्यात आले

आता आगामी दोन वर्षानंतर येणारी राणी मसलानाबो मोदजादजी खूप खास आहे. कारण 50 वर्षांनंतर पुन्हा या प्रांतावर राण्यांचे राज्य येणार आहे. याआधी केवळ 3 राण्यांच्या राज्यानंतर वंशद्वेषामुळे ही प्रथा बंद झाली होती. 1972मध्ये राणीचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि राणी ही फक्त नावापुरती उरली.

2016 मध्ये झाला बदल

2016 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी दक्षिण आफ्रिकेत या प्रांताला एक विशेष दर्जा दिला आणि राणीच्या अधिपत्याखाली स्वतःचे स्वतंत्र राज्य चालवण्याची परवानगी दिली. यानंतर या राजकुमारीला भावी राणीचा कायदेशीर दर्जा देण्यात आला.

राजेशाही थाट

राणी झाल्यानंतर, मसलनाबोच्या अधिकारात 100 गावं असतील. यासह, आपलं राणीचं जीवन जगण्यासाठी तिला शासकीय मदतही मिळणार आहे. मसलानाबोची आई ही पहिली राणी होती. ती इंग्रजी बोलायची तसंच कारही चालवायची. परदेशी माध्यमांनाही ती भेटायची. आता ही भावी राणीही झिम्बाब्वेमध्ये राहून शिकत आहे.

परंपराचं पालन करावं लागेल

योग्य वय झाल्यानंतर, या राजकुमारीकडे सत्ता सुपूर्द केली जाईल. तेव्हा सुरुवातीलाच तिला पाऊस आणण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी लागेल. या काळात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचीही पूजा केली जाते आणि रात्रीच्या वेळी पावसाच्या देवतेला आवाहन केलं जातं. या राणीकडंही पूर्वीच्या राण्यांप्रमाणेच पाऊस पाडण्याची शक्ती आहे की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु या राजकुमारीकडे आतापासूनच पवित्र शक्ती म्हणून पाहण्यात येत आहे.

राणीचं आयुष्य खूपच वेगळं

सामान्य महिलांपेक्षा या राणीचं आयुष्य अगदी वेगळं असतं. ही राणी पुरुषांऐवजी स्त्रियांशी लग्न करते. यानंतर त्या महिला राजघराण्यातील पुरुषांशी संबंध ठेवतात आणि त्याच्यापासून जन्माला आलेल्या मुलांना राणीची मुलचं म्हटलं जातं. राणीला तिचं स्वतःच मूल नसतं, अशी माहिती विट्स युनिव्हर्सिटीचे संशोधक डेव्हिड कोपलँड यांनी दिली असून न्यूज 24 मधील एका अहवालात ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Rain, South africa