मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss: पुरुषांनी वजन कमी करण्याचं टेन्शन सोडून द्या; फक्त या 5 सोप्या टिप्स वापरा

Weight Loss: पुरुषांनी वजन कमी करण्याचं टेन्शन सोडून द्या; फक्त या 5 सोप्या टिप्स वापरा

वजन कमी करणे कोणासाठीही सोपं काम नाही. पुरुषांना नोकरीशिवाय इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे अनेकदा ते वजन कमी करण्याचे रुटीन फॉलो करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तरी पुरेसे आहे. जाणून घेऊया.

वजन कमी करणे कोणासाठीही सोपं काम नाही. पुरुषांना नोकरीशिवाय इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे अनेकदा ते वजन कमी करण्याचे रुटीन फॉलो करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तरी पुरेसे आहे. जाणून घेऊया.

वजन कमी करणे कोणासाठीही सोपं काम नाही. पुरुषांना नोकरीशिवाय इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे अनेकदा ते वजन कमी करण्याचे रुटीन फॉलो करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तरी पुरेसे आहे. जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 16 जून : वजन वाढणे कोणत्याही परिस्थितीत शरीरासाठी चांगले नाही, कारण लठ्ठपणा अनेक आजारांना जन्म देतो. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी समस्या उद्भवू शकतात. आपण पुरुषांच्या वजन वाढण्याबद्दल बोलायचे झाल्यास बहुतेक पुरुष स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. पोट बाहेर येऊ नये म्हणून जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी भरपूर धावणे, जॉगिंग देखील करतात. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट फॉलो करतात, पण या गोष्टी करूनही त्यांच्याकडून काही चुका होतात. वजन कमी करण्यासाठी कशा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याचीही योग्य माहिती असली पाहिजे, तरच वजन लवकर कमी (Weight Loss Tips for Men) होईल.

मात्र, वजन कमी करणे कोणासाठीही सोपं काम नाही. पुरुषांना नोकरीशिवाय इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे अनेकदा ते वजन कमी करण्याचे रुटीन फॉलो करू शकत नाहीत. काही वेळा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत केलेल्या चुकांमुळे फारसा फायदा दिसत नाही. काळजी करू नका, आपल्याला वजन कमी करायचे असेल तर येथे सांगितलेल्या या 5 वजन कमी करण्याच्या टिप्स फॉलो करा.

वेट लॉस डाइट ठेवू नका -

OnlyMyHealth मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट उपलब्ध आहेत, ज्याचा अनेकजण अवलंब करतात. मात्र, होतं असं की, आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात काही काळासाठी आहार फॉलो करतो, ज्यामुळे आपल्याला लगेच फायदा होतो, परंतु काही दिवसांनी वजन पुन्हा वाढू लागते. निरोगी शरीरासाठी, सतत वजन कमी करत राहणे आवश्यक आहे. तसेच, हे वजन कमी करणारे आहार आपल्याला अनेक आवश्यक पोषक, पदार्थ खाण्यापासून देखील प्रतिबंधित करतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासोबतच तुम्हाला संतुलित आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल. यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा खास खाण्यापिण्याचा प्लॅन बनवावा, ज्यामध्ये ना खूप बंधने आहेत ना डाएट प्लॅन फार गुंतागुंतीचा आहे.

भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी अंतराने खात राहा -

वजन कमी करण्यासाठी खाणं सोडणं हा अजिबात आरोग्यदायी मार्ग नाही. तुम्ही जास्त वेळ उपाशी राहिल्यास, भूक लागल्यावर तुम्ही खूप खाल. तुम्ही कामात व्यग्र असता, पटकन जेवता येत नाही, यासाठी आपण दर चार तासांनी जेवतो. यामुळे आपली भूकही शमते आणि शुगर लेव्हलवरही परिणाम होणार नाही. सकाळी 8 वाजता नाश्ता म्हणून काही तरी खा. दिवसाचे जेवण 12-1 वाजेच्या दरम्यान घ्या. 3 ते 4 वाजेच्या दरम्यान आरोग्यदायी स्नॅक्स घ्या आणि रात्रीचे जेवण 6:30 ते 7:30 दरम्यान घ्या. हा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांचे वजन जलद आणि निरोगी मार्गाने कमी करायचे आहे.

पुरेसे पाणी प्या -

पाणी प्यायल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतोच, त्याच बरोबर अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. पाण्याचे सेवन वाढल्याने शरीर आपले कार्य योग्य प्रकारे करते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतही पाणी खूप प्रभावी आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, थकवा, सुस्ती, बैचेनी, मूड बदलणे इ. गोष्टी होतात.

हे वाचा -  जेवणाची भांडी, ताट-वाटीचाही आरोग्यावर होतो परिणाम; या गोष्टींकडे दुर्लक्ष नको

संतुलित आहार घेणे महत्त्वाचे -

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात संतुलित प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश करा. प्रत्येक जेवणात प्रथिनांचे प्रमाण 40 टक्के, कर्बोदकांचे प्रमाण 35 टक्के आणि निरोगी चरबीचे प्रमाण 25 टक्के असावे. यामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतील, वजन देखील निरोगी पद्धतीने कमी होईल आणि चयापचय देखील वाढेल. आहारात हेल्दी कार्ब्सचा समावेश करा. चांगल्या कार्बोहायड्रेट्सच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होत नाही. तुम्ही बराच काळ पोट भरलेले वाटते.

हे वाचा - Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा?

दररोज अर्धा तास शारीरिक व्यायाम -

आपल्या व्यग्र दिनचर्येमुळे तुम्हाला जिममध्ये जाऊन वजन कमी करता येत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सकाळी 30 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढा. अर्थात, यासाठी तुम्हाला थोडे लवकर उठावे लागेल. व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तुम्ही दररोज फक्त 30 मिनिटे शारीरिक हालचाली करून तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करू शकता. तुमच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जा, बागकाम करा, घरातील कामे करा, सायकल चालवा इ. या सर्व गोष्टी सतत करा, वजन कमी होऊ लागेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Weight, Weight loss tips