दिल्ली, 04 ऑगस्ट : दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर, काहीतरी गोड खायला हवं. त्यामुळेच तर, चॉकलेट (Chocolate)लहान मोठे सर्वांच्याच आवडीचं असतं. काही खास प्रकारचे चॉकलेट आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर (Benefit) असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे बऱ्याच गंभीर रोगांपासून आपल्याला दूर राहण्यास मदत होते. ज्यांना रक्तदाबची (Blood Pressure)समस्या आहे. अशांना डॉक्टर विशिष्ट प्रकारचे चॉकलेट खाण्याची शिफारस देखील करतात. चॉकलेट खाल्ल्याने मनावरचा ताणही (Stress) कमी होतो. खरंतर लोक आवड आणि टेस्टसाठी चॉकलेट खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट खायला आवडतं. मात्रं चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात किंवा आरोग्यावर काही वाईट परिणाम होतात या भीतीपोटी पालक मुलांना चॉकलेट खाण्यापासून रोखतात. एवढंच काय मोठे देखील वजन वाढण्याच्या भीतीमुळे चॉकलेट खाताना विशेष काळजी घेतात. पण, आता एका संशोधनानुसार चॉकलेट खाताना वजन वाढण्याचं टेन्शन कमी होणार आहे.
('या' पद्धतीने करा चविष्ट कोशिंबीर तयार; इम्युनिटी वाढेल, वजन होईल कमी)
The FASEB Journal मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हार्वर्ड युनिवर्स्टीची मान्यता असलेल्या Brigham and Women's Hospital चे प्रोफेसर Frank A.J.L. Scheer आणि Marta Garaulet यांनी हे संशोधन केलं आहे. स्पेनच्या विश्वविद्यालयात या संदर्भामध्ये संशोधन करण्यात आलेला आहे. ज्यानुसार मोनोपोज झालेल्या 19 महिलांना व्हाईट चॉकलेट खाण्यास सांगण्यात आलं. या महिलांना दररोज 100 ग्रॅम मिल्क चॉकलेट खाण्यास देण्यात आलं. त्यानंतर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.
(Kaolin clay: ही माती त्वचेवर करेल चमत्कार; नितळ, कुठे मिळेल, कशी वापराल?)
रिसर्च रिपोर्ट
यानुसार सकाळी किंवा रात्रीच्या वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढत नाही. या दोन्ही वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्यास भूक लागणं, मायक्रोबायोटा कंपोझिशन, झोप यासारख्या गोष्टींवर सकारात्मक परिणाम होतो.
सकाळच्या वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्याने वजन आणि ब्लड ग्लूकोज कमी व्हायला मदत होते. संध्याकाळी चॉकलेट खाल्ल्यास सकाळी एक्ससाइज करताना मेटाबोलिजममध्ये फरक पाहायला मिळाला.
(डासांनीच काढणार मलेरियाचा काटा; मादी डासांना नपुसंक बनवून होणार आजाराचा खात्मा)
व्हाईट चॉकलेटचे चांगले परिणाम
संशोधकांच्या मते मी चॉकलेट काट बर्नर प्रमाणे काम करतं याशिवाय रक्तातली साखर देखील कमी करतं.
व्हाईट चॉकलेट (White Chocolate) कोको बटर, साखर आणि दुधापासून तयार केलं जातं. यात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडांना फायदा होतो.
(जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर)
व्हाईट चॉकलेटमध्ये कॅफिन नसतं. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.आपल्या हृदयावरही सकारात्मक परिणाम होतो. ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. रक्त प्रवाह सुधारतो.
यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडांना फायदा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.