रिझल्ट ओरिएन्टेड काम करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत 'या' 7 गोष्टी

रिझल्ट ओरिएन्टेड काम करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत 'या' 7 गोष्टी

काळानुरुप प्रत्येकाला स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे, जर तुम्ही ते केले नाहीत तर तुम्ही कालबाह्य ठरता.

  • Share this:

मुंबई, 14 जून : काळानुरुप प्रत्येकाला स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे, जर तुम्ही ते केले नाहीत तर तुम्ही कालबाह्य ठरता आणि तुमची गाडी हळूहळू साइडिंगला पडते. सद्याच्या कार्पोरेट विश्वात औपचारिकतेला खूप महत्त्व आलं आहे. तुमच्या पेहरावापासून ते तुमच्या वागणुकीपर्यंत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं जातं. तुम्ही या विश्वात हळूहळू रुळायला लागलात की, सुरू होतो तो बिझनेस मिटिंग्सचा सपाटा. अशा मिटिंगप्रसंगी कोणाशी कसं वागावं, काय बोलावं या गोंधळात जर तुम्ही असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा कार्पोरेट वातावरणात रिझल्ट ओरिएन्टेड काम कसं करायचं यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत.

नोकरीसाठी पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला जाताय? मग 'या' 5 टिप्स एकदा वाचा

1 - सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इतरांच्या वेळेचा मान ठेवणं. मिटिंगच्या ठिकाणी वेळेवर किंबहुना वेळेआधी पोहोचा. तुमच्यामुळे समोरच्या व्यक्तीचा वेळ अजिबात वाया जाता कामा नेये.

2 - एकमेकांना भेटल्यानंतर मिटिंग सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाला हस्तांदोलन करा. यामुळे समोरची व्यक्ती तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकते. हस्तांदोलन करताना समोरच्या व्यक्तीचं वय किंवा ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री आहे याचा विचार करू नका.

4 - उत्तम पेहरावामुळे आत्मविश्वास वाढतो हे खरं आहे. त्यामुळे मिटिंगला जाताना तुम्हाला योग्य वाटेल असा पण नियमांमध्ये बसणारा पेहराव करायला हवा.

5 - मिटिंगचा विषय आणि मांडायचे मुद्दे याचा एक अजेंडा तयार करा. विचारायच्या आणि उत्तर द्यायच्या प्रश्नांच्या तयारीनिशी मिटिंगला सुरुवात करा.

तुम्ही वारंवार तुमचा स्मार्टफोनमध्ये डोकावता का? लगेच सोडा ही सवय, कारण..

6 - मिटिंग सुरू असताना मोबाइल सायलेंट मोडवर आणि तुमच्यापासून जरा दूर ठेवा. त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. तातडीने एखादा फोन किंवा मॅसेज करायचाच असेल तर मिटिंग रुमच्या बाहेर जाऊन करा.

7 - मिटिंगला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीच्या उंचीचा अंदाज घेऊन असनव्यवस्था असायला हवी. यामुळे एकमेकांशी संवाद साधण्यास सुलभता ठरते.

First published: June 14, 2019, 3:36 PM IST
Tags: career

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading