मुंबई, 13 जून : लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच स्मार्टफोनचं आकर्षण असतं. प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या या भौतिक साधनानं अनेकांना अक्षरशः वेड लावलं आहे. तो साधा वाजला तरी अस्वस्थता निर्माण होते आणि नाही वाजली तर त्याहून जास्त बैचेनी त्यांच्या मनात निर्माण होते. काहीजण तर त्याच्या इतके आहारी गेलेले असतात की त्यांना वारंवार त्यात डोकावण्याची सवय जडली असते. स्मार्टफोनमध्ये वारंवार पाहण्याची ही सवय तुम्हालाही जडली असेल तर ती अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे संतुष्ट होण्याची भावना प्रभावित होऊ शकते.
जर तुम्हालासुद्धा आपला स्मार्टफोन वारंवार पाहण्याची सवय असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. ही सवयीमुळे तुमचं आयुष्य कमी होऊ शकतं असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या टेम्पल विद्यापीठातील मनोवैज्ञानिकांनी यासंदर्भात केलेल्या आभ्यासानंतर त्याचे दुष्परिणाम समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश लोकं दररोज सरासरी 4 तासांपर्यंत आपला फोन पाहत राहतात असंही त्यांनी म्हटलं आहे.
उत्तम टीम मेंबर व्हायचं असेल तर 'हे' 7 गुण तुमच्यात असायलाच हवेत
फोनबद्दल विचार करताच मनात तणाव निर्माण होतो आणि तो तणाव कमी करण्यासाठी वारंवार फोन तपासला जातो. पण अशा पद्धतीने फोन तपासल्याने तणाव कमी न होता तो आणखी वाढतो. कोणतातरी आलेला मॅसेज, कॉल किंवा आणखी एखादी बाब ज्यामुळे कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी आणखी वाढते. वारंवार आपला फोन पाहणं हे एक प्रकारचं व्यसन असून त्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी जर कमी करायची असेल तर फोनचे सगळे नोटिफिकेशन्स बंद करा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
तुम्हाला शांत झोप लागत नाही? तर मग हे नक्की वाचा
श्वासांवर लक्ष केंद्रित करून मेंदूवर नियंत्रण मिळवा, ज्यामुळे आपली फोन पाहण्याची इच्छा कमी होईल. सोशल मीडियावर पोस्ट टाकणं कमी करा. अनेकदा टाकलेल्या पोस्टवर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया बघण्यासाठी वारंवार फोन तपासला जातो. त्यात तर कमी लाइक्स, कमी किंवा उलटसुलट कमेंट्स असतील तर त्या वाचूनसुद्धा अनेकांचं मन व्यथित होतं, मूड जातो. साहजिकच मग या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच स्मार्टफोन वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.