मुंबई, 01 जुलै : आपल्यावर खरं प्रेम (Love) कुणाचं आहे, हे आपल्या कठीण काळातच समजतं. एकमेकांना मोठमोठी वचनं देणारे किती तरी जोडीदार (Couple) अडचणी येतात एकमेकांना सोडून जातात. आमचंच प्रेम खरं असं म्हणणारे काही दिवसही आपलं प्रेम टिकवू शकत नाही. खरं प्रेम (Love story) म्हणजे नेमकं काय असतं, हे खरंतर या दिव्यांग कपलकडून (Handicapped couple love story) शिकायला हवं. ज्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Handicapped couple viral video) होतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या दिव्यांग कपलची लव्ह स्टोरी पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला रडू आवऱणार नाही.
तरुणीला एक हात नाही तर तरुणाला दोन्ही पाय नाहीत. पण दोघांनाही त्यांच्या अवयवाची कमतरता कधीच जाणवत नाही. कारण हे दोन शरीर आणि एक जीव आहेत. जिथं हातांची गरज पडते तिथं तरुण तरुणीचा हात होतो. तर जिथं पायाची गरज पडते तिथं तरुणी त्याचा पाय बनून उभी राहते. हे वाचा - अरे यांना आवरा! सप्तपदी घेताना नवरा-नवरीचा प्रताप; Video पाहून नेटिझन्स शॉक व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला दोन्ही पाय नसलेला तरुण तरुणीच्या पायात चप्पल घालताना दिसतो आहे. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी एक हात नसलेली तरुणी आपल्या हातात एक बास्केट घेते, त्यात त्या तरुणाला बसवते आणि त्याला आपल्या खांद्यावर घेऊन चालू लगते. त्यांच्याती निखळ प्रेमही या व्हिडीओत दिसून येतं. तरुण तरुणीला फूल देऊन प्रपोज करतो, त्यानंतर आनंदाने तरुणी त्याला उचलून घेते. हे वाचा - घरात लागली आग; चिमुकलीने फक्त एक काम करून वाचवले सर्वांचे प्राण; पाहा VIDEO हे दिव्यांग कपल प्रेमाची एक नवी परिभाषा लिहिताना दिसत आहेत. IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण भावुक झाला आहे. त्यावर इमोशनल अशा प्रतिक्रिया येत आहेत.