Home /News /viral /

घरात लागली आग; चिमुकलीने फक्त एक काम करून वाचवले सर्वांचे प्राण; पाहा VIDEO

घरात लागली आग; चिमुकलीने फक्त एक काम करून वाचवले सर्वांचे प्राण; पाहा VIDEO

आग लागल्यानंतर नेमकं काय करावं हे मोठ्या माणसांनाही समजत नाही पण चिमुकलीने काय केलं ते तुम्हीच पाहा.

  मुंबई, 01 जुलै : आग (Fire) लागलेली दिसली की भल्याभल्यांचा घाम फुटतो. या परिस्थिती काय करावं तेच सूचत नाही. पण एका चिमुकलीने मात्र घरात आग लागताच असं काम केलं आहे, जे प्रौढ माणसंही करू शकत नाहीत. आगीला न घाबरता तिने एक काम करून आपल्या घरासह घरातील लोकांचाही जीव (Little girl saved hom from fire) वाचवला आहे. आगीपासून सर्वांना वाचवणाऱ्या या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल  (Viral Video)  होत आहे. हिरो म्हणून ही मुलगी सोशल मीडियावर चर्तेत आहे. तिच्या वडीलांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
  Daniel Patrick Jermyn या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे वाचा - झोपेतच चिमुकल्याच्या तोंडून निघालेले ते शब्द ऐकून नेटकरी भावुक; पाहा VIRAL VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी घरात खेळते आहे, तेव्हा तिच्या तिच्या किचनमध्ये आग लागल्याचं दिसते. ती तिथं जवळ येते आणि म्हणताना दिसते की अरे नाही, माझा बाबा तर आता मला मारतील. त्यानंतर ती थोडा विचार करते आणि तिथून दूर धावत जाते. त्यानंतर ती आपल्या घरात आग लागल्याची माहिती तिच्या वडिलांना देते. तिचे वडील पळत घरात येतात आणि ज्या एअर फ्रायरला आग लागली आहे, तो उचलतात आणि तो बाहेर फेकून देतात. त्यानंतर तो फ्रायर बाहेर नेताना इतर सामानांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतात. हे वाचा - हे काम कर लागेल मुलांची लाइन; लग्नासाठी मुलगा न सापडणाऱ्या नातीला आजीच्या टिप्स ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलीच्या वडिलांनी आपल्या सोसल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या मुलीचं त्यांनी कौतुक केलं आहे. ते म्हणाले, आज माझ्या मुलीने माझ्या घराला वाचवलं आहे. एअर फ्रायरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. आज ती खरी हिरो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स चिमुकलीच्या हिमतीला दाद देत आहे. तिचं भरभरून कौतुक होत आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Fire, Small child, Viral

  पुढील बातम्या