मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अरे यांना आवरा! सप्तपदी घेताना नवरा-नवरीचा प्रताप; Wedding Video पाहून नेटिझन्स शॉक

अरे यांना आवरा! सप्तपदी घेताना नवरा-नवरीचा प्रताप; Wedding Video पाहून नेटिझन्स शॉक

सप्तपदी घेता घेता नवरा-नवरी अचानक...

सप्तपदी घेता घेता नवरा-नवरी अचानक...

सप्तपदी घेता घेता नवरा-नवरी अचानक...

मुंबई, 01 जुलै: लग्न (Wedding video) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनमोल असा क्षण असतो आणि हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. असाच प्रयत्न एका नवरा-नवरीने (Bride and groom video) केला. ज्यांचा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे.

लग्नातील सप्तपदीचा एक व्हिडीओ (Wedding viral video) व्हायरल होतो आहे. ज्यात नवरा-नवरीने हटके पद्धतीने सप्तपदी केली. पण त्यांचा हा व्हिडीओ अनेकांना बिलकुल आवडला नाही. आवडणं तर दूर अनेक जण हा व्हिडीओ पाहून संतप्त झाले आहेत.

व्हिडीओत पाहू शकता, नवरा आणि नवरी सप्तपदी घेत आहेत. अचानक दोघंही नाचू लागतात एका हिंदी गाण्यावर डान्स (Bride and groom dance during phere) करू लागतात. डान्स करत करत ते फेरे घेताना दिसत आहे.

हे वाचा - घरात लागली आग; चिमुकलीने फक्त एक काम करून वाचवले सर्वांचे प्राण; पाहा VIDEO

नवरा - नवरीला असं करताना मजा वाटत असेल, पण नेटिझन्सनी मात्र त्यांना चांगलंच सुनावलं आहे. सप्तपदी हा लग्नाच्या विधीतील एक पवित्र असा विधी आणि त्यावेळी असं करणं म्हणजे चुकीचं आहे, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. ज्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे, त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, हे लग्न आहे की संस्कारांची आहुती? हे विसरू नका की, तुम्ही जगात पूजनीय आहे ते फक्त आपली संस्कृती आणि संस्कारांमुळे.

हे वाचा - लग्नाला बोलावलं आणि पाहुण्यांकडून घेतली भांडी घासून; वधु-वराचा विचित्र फंडा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही नेटिझन्सही भडकले आहेत. त्यांनीसुद्धा अशाच आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Social media viral, Viral, Viral videos, Wedding video