Home /News /lifestyle /

Health Tips : काही आजारांपूर्वी तुमचे पाय देतात 'हे' संकेत, वेळीच व्हायला हवे सावध

Health Tips : काही आजारांपूर्वी तुमचे पाय देतात 'हे' संकेत, वेळीच व्हायला हवे सावध

काही आजार होण्यापूर्वी किंवा त्या आजाराचे लक्षण म्हणून तुमचे पाय तुम्हाला काही संकेत देत असतात. जर हे संकेत तुम्ही (Hidden Diseases In Body) वेळीच ओळखले तर तुम्ही अनेक गंभीर समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता.

  मुंबई, 25 जून : आपले शरीर त्याच्यामध्ये होत असणारे बदल खूप लवकर लक्षात घेते. अनेक आजार आपले शरीर आपल्या नकळत बरे करत असते. अर्थात तुमची रोगप्रतिकारशक्ती तितकी चांगली असेल तरच. मात्र तुम्हाला माहिती आहे का? काही आजार होण्यापूर्वी किंवा त्या आजाराचे लक्षण म्हणून तुमचे पाय तुम्हाला काही संकेत देत असतात. जर हे संकेत तुम्ही (Hidden Diseases In Body) वेळीच ओळखले तर तुम्ही अनेक गंभीर समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता. आपले पाय (Legs Gives Signs Before Some Diseases) आपल्याला कोणकोणते संकेत देतात. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचे पाय आणि बोटांवरचे केस अचानक गळायला लागले तर हे रक्ताभिसरणात व्यवस्थित होत नसल्याचे लक्षण मानले जाते. पुरेशा प्रमाणात रक्ताभिसरण न झाल्यास पायावरचे केस गळू लागतात. कारण त्यांना पोषण मिळत नाही. हे देखील एक लक्षण असू शकते की तुमचे हृदय नियमितपणे पायांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे रक्त पंप करत नाही. याशिवाय अंगठा अचानक सुजला किंवा लाल झाला किंवा सांधे दुखत असतील तर ते सांधेदुखीचे लक्षण असू शकते. फक्त वाईट सवय समजू नका; माती, खडू असं नको ते खाणं म्हणजे आहे एक आजार त्याचप्रमाणे जर तुमची टाच दुखत असेल तर तुम्हाला शूज बदलण्याची गरज आहे. तुमची त्वचा खरबडीत झाली असेल किंवा पिवळी पडली असेल तर हे बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण आहे. पाय शक्य तितके कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. जर फंगल इन्फेक्शन नसेल तर तो एक्जिमा देखील असू शकतो परंतु स्वतःहून कोणत्याही निष्कर्षावर जाण्याऐवजी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. अनेकदा ज्या जखमा बऱ्या होत नाहीत त्या मधुमेह दर्शवू शकतात. रक्तातील ग्लुकोजच्या अनियंत्रित पातळीमुळे पायापर्यंतच्या नसा खराब होतात. याचा अर्थ असा की जर तुमच्या पायात एखादी जखम किंवा मुरुम आला आणि त्यात इन्फेक्शन झाले तर प्रकरण आणखी बिघडू शकते. म्हणूनच, पायांची नियमित काळजी घ्या. त्याशिवाय बरी न होणारी जखम हे त्वचेच्या कर्करोगाचेदेखील लक्षण असू शकते. जर पायात गोळे किंवा पेटके येत असतील तर ते तुमच्या शरीरात डिहायड्रेशन आणि पोषक तत्वांची कमतरता असल्याचे दर्शवते. त्यामुळे अधिकाधिक पाणी प्या कारण अनेकदा डिहायड्रेशनमुळे असा त्रास होऊ शकतो. याशिवाय गरज असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या तुमचे पाय थंड पडल्यास हे हायपोथायरॉईडीझमचे लक्षण असू शकते. ज्यामध्ये तुमचे पाय उबदार राहात नाहीत. वयाच्या 40 नंतर ही समस्या अनेकदा दिसून येते आणि लोक हवामानाचा परिणाम समजून त्याकडे दुर्लक्ष करत असतात. म्हणून पाय थंड होण्याची तक्रार समजताच डॉक्टरांशी संपर्क साधा. जितके लवकर यावर उपचार होतील तितके चांगले.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Disease symptoms, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या